अकोल्याची हिमांशी ‘मिस महाराष्ट्र’ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

अकोला - वर्धा येथील दत्ता मेघे फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘वर्धा कला महोत्सव २०१८’ मध्ये फॅशन शो नुकताच पार पडला. त्यामध्ये अकोल्यातील हिमांशी चंद्रकांत रुपारेल हिने प्रथम क्रमांक मिळवित ‘मिस महाराष्ट्र मिरर २०१८’ हा सन्मान प्राप्त केला. 
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता ठरविणारी चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीसाठी शेकडो युवतींनी सहभाग घेतला होता. त्यामधून ठराविक १६ युवतींची निवड अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली होती. या युवतीमधून अखेर हिमांशी रुपारेल हिने बाजी मारत अकोल्याच्या नावलौकिकात भर घातली. हिमांशी ही अकोल्यातील भाजपाच्या महिला नेत्या शितल रुपारेल यांची मुलगी आहे.

Web Title: marathi news himanshi ruparel miss maharashtra