कोंबिंग ऑपरेशन दरम्यान तोडफोड प्रकरणी २० जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

खामगाव (बुलढाणा) - बंद दरम्यान तोडफोड प्रकरणी २० जणांना सोमवारी (ता.१५) अटक करण्यात आली आहे. यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही जणांचे हद्द्पार प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी दिली. 

कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंद दरम्यान आंदोलकांनी शहरात वाहने व दुकानांची तोडफोड केली होती. या प्रकरणात जवळपास २०० लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. दरम्यान सोमवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत २० जणांना अटक करण्यात आली. यात दंगल भडकविणे, तेढ निर्माण करणे असे गुन्हे दाखल असतील त्यांचे हद्दपार प्रस्ताव पाठविले जाणार आहेत, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तमराव जाधव यांनी दिली.

Web Title: marathi news kombing operation tweenty people arrested