मुंबईत गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

ज्ञानेश्वर ठाकरे 
रविवार, 31 डिसेंबर 2017

महागांव : तालुक्यातील गुंज येथील शैलेश नरसिंग चव्हाण या इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मुंबईत दादर प.पो.स्टे.हद्दीतील प्रभादेवी भागात भाड्याच्या घरात दोन मित्रासह राहत असे. २९ डिसेंब रोजी शैलेश दिवसभर रूमच्या बाहेर निघाला नसल्याचे पाहून घरमालकांनी त्याचा कानोसा घेतला असता दरवाजा बंद अवस्थेत होता. 

आतमध्ये शैलेश गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने शुक्रवारी सायंकाळी शैलेशच्या वडिलांना घरमालकांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शैलेशचे वडिल नरसिंग चव्हाण मुंबईला रवाना झाले.

घटनास्थळी पोचल्यावर नरसिंग चव्हाण यांनी या घटनेची शहानिशा करून स्थानिक दादर पोलिस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केल्याची माहिती चव्हाण यांनी 'सकाळ'ला फोनवरून दिली. आपल्या मुलाचा लटकलेला मृतदेह, हाताच्या शिरा कापलेल्या होत्या तर गळ्याभोवती खुना होत्या. ही आत्महत्या नसून घात झाल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला.

घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा स्टूल किंवा टेबल नसल्याची माहिती मिळत आहे. शैलेश यांचे वडील व आई दोन दिवसांपूर्वीच भेट झाली होती. वडिलांनी मुलाच्या मृत्यूचा निपक्षपणे तपास व्हावा, अशी मागणी केली .

नरसिंग चव्हाण हे शिळोना येथे मुख्याध्यापक आहेत. तर बहिण मुंबईत बीएएमएसचे शिक्षण घेत आहे. भाऊ पुसद येथे शिक्षण घेत आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपास सुरू आहे.

मुंबईत घडलेली ही महागाव तालुक्यातील दुसरी घटना असून एका आठवड्यातील या दोन घटना आहेत .या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी मुंबई येथे २६ रोजी तालुक्यातील सवना येथील विद्या करोडकर नामक विद्यार्थिनीच्या आत्महत्याची घटना उघडकीस आली होती.

या घटनेनंतर आता शैलेश चव्हाण या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याच्य आत्महत्येची एक घटना समोर आली आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी पाठविलेल्या विद्यार्थ्याच्या पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Web Title: marathi news local mumbai news crime news youth suicides in mumbai hang