नगरपरिषद परिसरात कचरा असल्याने नागरिकांकडून कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

दंड भरून देखील अनेकांनी आपल्या मालमत्तेवरील कचरा साफ केला. मात्र, नगरपरिषदेच्या कार्यालयीन इमारत परिसरात स्वत:च्या मालमत्तांवर असलेला बेवारस झाडे आणि कचरा आहे.

पवनी : नगरपरिषदेने 'स्वच्छ सर्वेक्षण 2018' साठी तयारी सुरु केली. शहरातील अनेक नागरिकांच्या खाजगी मालमत्तेवर कचरा, घरातील मलबा असल्यास नगरपरिषद प्रशासनाने मालमत्ता धारकांवर दंड बजावून कारवाई केली. मात्र, नगरपरिषद परिसरात कचरा असल्याने यावर कोण दंड आकारणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. 

नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचा प्रथम पुरस्कार घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेकांना नियम बाहेर दंड ठोठावण्यात आल्याने स्वच्छतेच्या नावाखाली अनेक उपयोगी वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्याचा विरोधसुद्धा वृक्षप्रेमीने केली आहे. नगरपरिषदेने सामान्य जनतेत स्वच्छतेचा मनोबल वाढवण्याऐवजी नियमबाह्य दंड वसूल केला.

दंड भरून देखील अनेकांनी आपल्या मालमत्तेवरील कचरा साफ केला. मात्र, नगरपरिषदेच्या कार्यालयीन इमारत परिसरात स्वत:च्या मालमत्तांवर असलेला बेवारस झाडे आणि कचरा आहे. याकडे मात्र याच विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. दुसऱ्याच्या मालमत्तेवर दंड देणाऱ्या विभागवार आता दंड कोणी ठोकावे.

महिनाभरापासून स्वच्छतेसाठी घोडदौड करणारी नगरपरिषद अनेकांना साफसफाई करण्यासाठी सांगणाऱ्या प्रशासनाला त्यांच्याच जागेचा विसर कसा पडला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: marathi news local news bhandara news citizens demanding to take action