नगरपरिषदेच्या स्वच्छता रॅलीत डीजेच्या तालावर अधिकारी, नगरसेवकांचा डान्स

नगरपरिषदेच्या स्वच्छता रॅलीत डीजेच्या तालावर अधिकारी, नगरसेवकांचा डान्स

पवनी : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी नागरिकांना सहभागी करता यावे, यासाठी नगरपरिषद पवनी स्वच्छता सर्वेक्षण रॅली काढली. शहरातून स्वछतेचे संदेश देण्याएेवजी डीजेचा धिंगाणा घातला फिल्मी तराण्यावर अधिकारी, नगरसेवक बिनधास्त नाचले. नगरपरिषद महाविद्यालय येथील विद्यार्थी यांना स्वछतेचा संदेश देणे दूर त्यांना सुद्धा नाचण्यास भाग पडल्याने निघालेल्या या स्वच्छता सर्वेक्षण रॅलीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
 
शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेसाठी नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यासाठी स्वच्छता अ‍ॅपही तयार करण्यात आला आहे. भ्रमणध्वनीद्वारे स्वच्छतेच्या बाबतीत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पवनी नगर परिषदेने आतापर्यंत चांगली कामगिरी बजावली होती. परंतु नगर परिषदेच्यावतीने पवनीत स्वच्छता दौड आयोजित करण्यात आली. यात नगराध्यक्ष पूनम काटेखाये, मुख्याधिकारी माधुरी मडावी, नगर परिषदेचे पदाधिकारी, शाळकरी विद्यार्थी व नागरिक या दौडमध्ये सहभागी झाले होते.

या दौडचा उद्देश जरी उदात्त असला तरी कालच शहरात हुतात्म्याला श्रद्धांजली देण्यात आली. शोक कायम असतानाही दौडच्या नावाखाली डीजेचा उन्माद कशासाठी, असा सवाल गावकऱ्यांनी केला.

पवनी येथील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे शहीद होऊन मोजके दिवसच उलटत नाही तर पवनी शहरात डीजेच्या तालावर जल्लोष साजरा करण्यात आला. रात्री पवनी विकास अघाडीने प्रफुल्ल यांच्या श्रद्धांजलीचा कर्यक्रम घेतला. तर याच सत्ताधारी आघाडीसह मित्रपक्ष दुसऱ्या दिवशीच न्यायालयीन आदेशाचे उलंघन करत विनापरवानगी रॅली व डीजे कडण्याची धमाल केली.

नगरपरिषद व पवनी विकास आघाडीने शहीद वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी शहरातील प्रत्येक मार्गावर बॅनर लावले. तर दुसरीकडे त्याच मार्गावरुन डीजेवर फिल्मी मिक्ससिंग गाणे वाजवत सर्वच नाचण्याच्या धुंदीत शहीदांचा विसर पडला. मुख्याधिकारी, नगराध्यक्षसह विद्यार्थी सहभागी होते. बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदूरकर यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवत मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com