बुद्धिमत्तेची जोड देत उज्ज्वलची दूध व्यवसायात उभारी

पंजाबराव  ठाकरे
शनिवार, 13 जानेवारी 2018

दुधाची आवक वाढू लागली. 20 लिटरची आवक 500 ते 600 लिटरपर्यंत होऊ लागल्याने उज्ज्वलचा उत्साह वाढीस लागला. उज्ज्वलचे पूर्ण कुटुंब या व्यवसायात सामिल झाले. भांडवल उभारणीसाठी नाबार्डअंतर्गत कर्जप्रकरण करुन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूरमध्ये दाखल केले.

संग्रामपूर :तालुक्यातील निरोड बाजार येथील युवकाने कष्टाला बुद्धिमत्तेची जोड देत दूध व्यवसायात उभारी घेतली आहे. तालुका ठिकाणी दूध संकलनची सुविधा उभी केल्याने या भागातील दूध उत्पादन वाढीस लागले आहे. दररोज सहाशे लिटर दूध विक्रीसाठी यांत्रिकी करण्याची जोड देऊन खवा निर्मितीची मिशनरी खेड्यात उभारण्याची हिंमत करणारा शेतकरी पूत्र उज्ज्वल पळसकार रोजगार निर्मितीसाठी आदर्श ठरणारा आहे. निरोड या खेडे गावातील अनंता पळसकार यांचा मुलगा उज्ज्वल याने कृषि पदविका शिक्षण पूर्ण केले.

सिंचन सुविधेसाठी पाणी नसल्याने शेती व्यवसाय करणे अवघड बनले आहे. म्हणून मुलाने नोकरी करावी, असा वडिलांचा कयास होता. परंतु, नोकरीपेक्षा स्वत:चा शेतीपूरक व्यवसाय उभारुन आपल्यासह इतर कुटुबीयांना आधार देण्याचा दृष्टीकोनसमोर ठेऊन उज्ज्वलने चार वर्षापूर्वी दूध व्यवसायात पाऊल टाकले. सुरवातीला संग्रामपूर येथे दूध सकलन केंद्र सुरु केले.त्यातून पुढे जात आजूबाजूच्या गावात दुधाळ जनावरे पालन करणारे वाढत गेले. 

दुधाची आवक वाढू लागली. 20 लिटरची आवक 500 ते 600 लिटरपर्यंत होऊ लागल्याने उज्ज्वलचा उत्साह वाढीस लागला. उज्ज्वलचे पूर्ण कुटुंब या व्यवसायात सामिल झाले. भांडवल उभारणीसाठी नाबार्डअंतर्गत कर्जप्रकरण करुन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूरमध्ये दाखल केले. मात्र, बँक प्रशासनाने
त्याचा हिरमोड केला. कृषि अधिकारी नसल्याचे कारण पुढे करून कर्जाची फाईल प्रलंबित ठेवली.

उज्ज्वलच्या वडिलांनी यावर पर्याय काढून पतसंस्थेकडून महागडे व्याज दराने भांडवल उभे केले. कोल्हापूर येथून खवा तयार करणारी मशीन खरेदी करुन हा व्यवसाय प्रगतीच्या वाटेवर सुरु झाला. सध्याच्या परिस्थितीत उज्ज्वलकडे 17 म्हैशी आहेत. त्यासाठी 2 एकर ठिबक सिंचनवर हिरवा चारा लागवड केला आहे. शेवाळ आधारित अजोला खाद्य तयार केले जात आहे. दररोज तीनशे लिटर दुधाचा खवानिर्मित करुन 40 किमी विक्रीसाठी न्यावा लागत आहे. खडतर परिस्थितीवर मात करून उज्ज्वलने खेडे भागात उभारलेला उद्योग तरुणासाठी दिशादर्शक ठरावा असा आहे.

Web Title: Marathi news local news buldana news milk business