वीटभट्टीवर आडजात लकडीचा प्रचंड वापर

Mahagaon
Mahagaon

महागाव : वीट भट्टी धारकाने सर्व अटी व नियमांना हरताळ पुसली असतांना स्थानिक प्रशाशकीय यंत्रनेने कर्यवाहीचा देखावा करत नाममात्र संबंधित विविध विभागाला सूचनापत्र दिले केले. महागाव तालुक्यातील हायवे रस्त्यालगत असलेल्या गुंज, महागाव, हीवरा, काळी दौ. परिसरासह विविध ठिकाणी सुरू असलेल्या वीटभट्टीवर मोठ्याप्रमाणात आडजात लकडिचा वापर होत असताना देखील येथील स्थानिक प्रशासकीय यंत्रणा गप्प आहे .

वीटभट्टी धारकाकडुन होत असलेली नियमांची पायमल्ली दैनिक सकाळने या आधीच प्रकाशित केलेल्या बातम्यांमधून प्रशासनाच्या लक्षात आणून दिले असतांना स्थानिक यंत्रणेने पंचायत विभाग व नगरपंचायत प्रशासनास नॉमिल सुचणापत्र देऊन आपली जबाबदारी पार पाडली. परंतु संबंधितांकडून ठोस अशी कोनतीही कार्यवाही केली नाही. यामध्ये प्रामुख्याने काळी दौ.वनपरिक्षेत्र विभागाचे या वीटभट्टीधारकाना पाठबळ आहे. रोहडा, कडुनिंब यासारख्या विविध जातींच्या व्रुक्षाची कत्तल करून या वीटभट्ट्यांवर विटा भाजण्यासाठी लकडीचा दिवसा ढवळ्या वापर होत असतांना सुद्धा वनविभाग व महसुल प्रशासन गप्प होते. विशिष्ट समाजाला शासनस्तरावरून पाचशे ब्रासची रॉयल्टी माफ करण्यात आली असली तरी वीट भट्टी सुरू करण्याच्या नियमांची अनेक वीट भट्टी धारकांनी मात्र पायमल्ली केलेली असून त्यांनी दोनशे मीटरचे अंतर न ठेवता अगदी रस्त्यालगतच आपली दुकानदारी थाटली आहे.

या संदर्भात मागील महिन्यात ३० नोहेंबरला सकाळने बातमी प्रकाशित करून सत्यता उघड केली होती. दरम्यान या बातमीने विटभट्टीधारकाचे चांगलेच धाबे दणाणले होते. शासनस्तरावरुन ही याची दखल घेतल्या गेली. परंतु कार्यवाहीचे चक्र मात्र संथगतीने फिरू लागल्याने वीटभट्टी धारकाणे परत अवैध्यरित्या आपले कार्य सुरूच ठेवले असल्याचे दिसून येत आहे.

वीट भट्टी चालविणे हा लघु उद्द्योग व्यवसाय असल्यामुळे नियम व अटीनां अधीन राहून हा व्यवसाय चालविणे कायद्द्याने बंधनकारक आहे. परंतु रस्त्यापासून दोनशे मीटर अंतारावर हा व्यवसाय सुरू आहे. नियमानुसार या नियमाचे पालन करणे गरजेचे असतांना सुद्धा याकडे काही वीट भट्टी धारकांनि मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नियमांस हरताळ फासला आहे. अशा वीट भट्टी धारकावर का? कार्यवाही करू नये असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

शासनाकडून विनामूल्य माती परवाना मिळालेल्या विशेष सवलतीचा कुंभार समाज बांधवांनीही योग्य प्रकारे भलेही काही प्रमाणात फायदा केला असावा परंतु अनेकांकडून मात्र अवैध्य गौन खनिज उत्खनन करून शासनाच्या मालमत्तेची चोरी सुद्धा करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात प्रधाशाकीय यंत्रणेने गंभीर दखल घेऊन कार्यवाही करावी अशी जनभावना आहे. विशेष लाकडी, कपाशीची झडे व इत्यादीच्या वापरामुळे मोठ्याप्रमाणात त्याचा धूर तयार होतो. परिणामी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांचे अपघात ही घडण्याची शक्यता बळावली आहे. तसेच पर्यावरणाच्या समतोलावर सुद्धा याचा विपरीत परीणाम होण्याची शक्यता मात्र नाकारता येणार नाही. नियमांची पायमल्ली करणाऱ्या संबंधित वीट भट्टी धारकांवर शासनस्तरावरून नेमकी काय कार्यवाही होणार याकडे जनतेचे वेधले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com