...आणि महिलांना पाहून उपजिल्हाधिकारी पळाले

योगेश फरपट
शनिवार, 17 जून 2017

अकोला - गावात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी तालुक्‍यातील बोरगाव मंजू येथील तीनशेपेक्षा जास्त महिलांनी लहानमुलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी (ता.17) मोर्चा काढला. "विनाकारणचा ताप डोक्‍याला नको' अशा भूमिकेत असलेले उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे हे महिलांना पाहून अक्षरशः पळाले. या प्रकाराने संतापलेल्या महिलांनी त्यांच्याच कार्यालयासमोर ठिय्या दिला.

अकोला - गावात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी तालुक्‍यातील बोरगाव मंजू येथील तीनशेपेक्षा जास्त महिलांनी लहानमुलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी (ता.17) मोर्चा काढला. "विनाकारणचा ताप डोक्‍याला नको' अशा भूमिकेत असलेले उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे हे महिलांना पाहून अक्षरशः पळाले. या प्रकाराने संतापलेल्या महिलांनी त्यांच्याच कार्यालयासमोर ठिय्या दिला.

अकोला तालुक्‍यातील बोरगाव मंजू येथे नियम धाब्यावर बसवत अबकारी विभागाने दारूच्या दुकानांना परवानगी दिली आहे. मंदिर, शाळा आणि भरवस्तीत दारूची दुकाने थाटण्यात आल्याने महिला, युवतींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत शनिवारी सकाळी गावातील महिला प्रथमच बोरगाव मंजू पोलिस स्थानकामध्ये तक्रार घेवून गेल्या. त्याठिकाणी ठाणेदाराकडून कोणतेही समाधान न झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या महिलांनी जिल्हाधिकारी आस्तीककुमार पाण्डेय यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र जिल्हाधिकारी दौऱ्यावर असल्याचे सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमडे यांनी सांगितले. त्यानंतर महिलांचा मोर्चा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या कार्यालयाकडे वळला. मात्र ते देखील कार्यालयात नसल्याने आंदोलनकर्त्या महिला उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांच्या कार्यालयात गेल्या. कार्यालयाबाहेर महिला आल्याचे लक्षात येताच महिलांची नजर चुकवत सुरंजे वाहनात बसून निघाले. जेव्हा महिला निवेदन देण्यासाठी गेल्या तेव्हा उपजिल्हाधिकारी सुरंजे त्यांच्या कक्षात उपस्थित नव्हते. त्यामुळे महिलांनी अधिकाऱ्यांच्या नावाने शिव्यांची लाखोळी वाहिली.

आताच भूक लागली होती काय?
पोलिसांना आंदोलनाची कल्पना होती. महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचण्याआधीच सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमडेसहित महिला पोलिसांची चमू दाखल झाली होती. महसूल अधिकाऱ्यांनासुद्धा या आंदोलनाबाबत माहित होते. मात्र "नसती झंझट नको' अशा मानसिकतेतील या कामचुकार अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकून आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्या महिलांनी तीव्र रोष व्यक्त केला.

निवेदन घेण्यासाठी अधिकारी मिळेना
तब्बल तीन तास महिला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत होत्या. मात्र त्यांचे निवेदन घेण्यासाठी एकही अधिकारी समोर आला नाही. अधिकाऱ्यांच्या अशा वृत्तीपुढे पोलिसांनीसुद्धा हात टेकले. अखेर महिलांनी सावलीचा सहारा घेत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर ठिय्या दिला.

'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
नगरजवळ 1 कोटींचा गांजा जप्त
कुमार विश्वासांविरोधात 'आप' कार्यालयाबाहेर पोस्टर्स
लग्नाच्या नाट्याची मनोरंजक कहाणी टी टी एम एम (तुझं तू माझं मी)
पानसरे हत्या: 21 महिन्यांनी समीरला जामीन

पुणे: उरूळीकांचनजवळ महिलेवर गाडीमध्ये सामुहिक बलात्कार
लातूर जिल्ह्यात एटीएसचे छापासत्र; टेलिफोन एक्‍सेंजचा अड्डा उद्ध्वस्त
काश्मीर: बीजबेहरा येथे सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला
नाशिक: जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू
मुंबई: बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ताब्यात
इंडियन अॅकॅडमी अॅवाॅर्ड सोहळा अमेरिकेमध्ये

Web Title: marathi news maharashtra news akola news deputy editor