दुःख उधळावयास आता आसवांना वेळ नाही

दुःख उधळावयास आता आसवांना वेळ नाही

चिमूर : केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारा २ ऑक्टोबर १९७५ पासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या या योजनेत ० ते ६ वयोगटातील बालकांना सकस आहार, आरोग्य, व्यक्तीगत स्वच्छतेचे धडे, आयांना संगोपनाची माहिती, शाळा पूर्व शिक्षण, सर्वेक्षण, हिशेब, गृहभेटी, कुटूंब नियोजन इत्यादी अनेक कामे करणाऱ्यांचे 'मानधन' या गोंडस नावाखाली आजपर्यंत शासनाद्वारे शोषण होत असून , दुःख उधळवयास आसवांनाही वेळ नसल्याची भावना जेलभरो आंदोलनात सामिल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले .

अंगणवाडी कर्मचारी सभेद्वारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र भर असहकार आंदोलन सुरू असून चिमूर येथे कार्याध्यक्ष मोहम्मद इखलाखभाई कुरेशी यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.

५ आक्टोबरला दुपारी ११ ते २ वाजेपर्यंत सत्य व अहिसेंच्या मार्गाने एकात्मीक बालविकास प्रकल्प कार्यालय , पंचायत समिती चिमूर येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले.

तत्पूर्वी पंचायत समिती प्रांगणातून मोर्चाच्या स्वरूपात उप -विभागीय अधिकारी , यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , अर्थमंत्री , महिला व बालविकास मंत्री , राज्यमंत्री , प्रधान सचिव इत्यांदिना द्यावयाचे निवेदन देण्यात आले .

मोर्चा व जेलभरो आंदोलनाच्या प्रमुख मागण्यामध्ये सन्माननीय जीवन जगण्यासाठी कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी व इतर लाभ मिळावा, सेवानिवृत्त झालेल्यांना एक रकमी लाभ द्यावा, मिनी अंगणवाडीस पूर्ण अंगणवाडीचा दर्जा द्यावा व त्यातील कार्यरत कर्मचाऱ्यांना समान वेतन व समान लाभ मिळावा, सर्व प्रकारचे भत्ते नियमित द्यावे, दस्ताएेवज साहित्य पुरवावे  आहाराचा दर ९ .९२ करावा, आहार शिजविणाऱ्यांना २ रुपये प्रति लाभार्थी भत्ता द्यावा, गरोदर व स्तनदा मातांचे चौरस आहाराचे ७५ रूपये द्यावे, रिक्त जागा त्वरीत भराव्या  प्रसुतीरजेत काम करणाऱ्याना सेविका व मदतनिसाचा अर्धा मोबदला द्यावा, अर्हताप्राप्त अंगणवाडी सेविकांमधून पर्यवेक्षकांची भरती प्रक्रीया तातडीने करण्यात यावी इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले.

शासन विरोधी नारे देत मोर्चा पंचायत समिती येथुन निघून उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन परत पंचायत समिती कार्यालय परीसरात येऊन जेलभरो आंदोलन करण्यात आले . चिमूर पोलीस स्टेशनच्या वतीने ठानेदार दिनेश लबडे यांनी अटक करण्या संबधिची कार्यवाही पार पाडली . या आंदोलनात जिल्हयाभरातुन हजारो अंगणवाडी कर्मचारी स्वंयस्फुर्तिने मिळेल त्या वाहनाने येऊन सहभागी झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com