मुंबईतील चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी करावी : रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

नागपूर : मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर आज झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. 

विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते नागपुरात आले असता त्यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. रेल्वे स्थानकावर पूल कोसळला, अशी अफवा पसरविणाऱ्या लोकांविरुद्ध सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात सरकारचा पाठिंबा काढू नये, अशी आपण त्यांना विनंती करीत आहोत. भाजप व शिवसेनेनी एकत्र काम करावे, अशी आपली इच्छा आहे. शिवसेनेने पाठिंबा काढला तर निवडणुका होण्याची शक्‍यता असल्याने व आमदारांना निवडणुका होऊ नये, असे वाटत असल्याने सरकार पडू न देण्यासाठी आपण 15 आमदारांची जमवाजमव करू पण सरकार पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

'राणेंना मंत्रीपद हवे' 
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, ''त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळेल किंवा नाही, हे मी सांगू शकत नाही. परंतु त्यांना मंत्री बनायचे आहे. एवढे मला माहित आहे. याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील.'' वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी येत्या 10 नोव्हेंबरला नागपुरात स्वतंत्र विदर्भ मागणी परिषद आयोजित केली आहे. या परिषदेला शिवसेनावगळता सर्व राजकीय पक्षांना निमंत्रित करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news marathi websites Elphinstone Station Mumbai Stampede