कमी पेट्रोल-डिझेल देणाऱ्या 1053 पंपांची तपासणी 

representational image of Petrol Pumps
representational image of Petrol Pumps

नागपूर : पेट्रोल व डिझेलच्या वितरणात फेरफार करून ते कमी मापाने देणाऱ्या पुणे, ठाणे आणि मुंबईतील 1053 पेट्रोल पंपांची तपासणी केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 101 प्रकरणे नोंदविली आहेत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यांतील पेट्रोल व डिझेल वितरणात फेरफार करणाऱ्या पंपचालकांवरील कारवाईबाबत आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, शरद रणपिसे यांच्यासह अन्य आमदारांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर बापट यांनी लेखी उत्तर दिले. 

ठाणे येथील पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने पंपांची तपासणी केली. त्यासाठी वैधमापन शास्त्र यंत्रणेतील क्षेत्रीय अधिकारीही नेमले होते, असे उत्तरात म्हटले आहे. दरम्यान, या तीनही जिल्ह्यांत पेट्रोल पंपांवर इलेक्‍ट्रॉनिक चीपच्या साह्याने पेट्रोल-डिझेलच्या वितरणात फेरफार करून ग्राहकांना मोजलेल्या किमतीपेक्षा कमी पेट्रोल देऊन फसवणूक झाली होती. याप्रकरणी किती पंपचालकांचे परवाने रद्द केले, असा प्रश्‍न विचारला होता. परंतु परवाने रद्द करण्याचे अधिकार वैधमापन यंत्रणेकडे नसल्याचे बापट यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com