महागावातील रस्तेविकासाला भ्रष्टाचाराची वाळवी

ज्ञानेश्‍वर ठाकरे
बुधवार, 27 डिसेंबर 2017

महागाव : विकासाला ग्रहण लागलेल्या महागाव शहरात नगरपंचायतीच्या विविध फंडातून रस्तेविकासाची कामे सुरू करण्यात आली असून कंत्राटदार नगरसेवकाने स्थानिक प्रभागातील विविध कामे स्वत:च्याच झोळीत पाडून घेतली आहेत. याआधी झालेल्या कामाचा दर्जा तपासून पाहता या कामांना भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे दिसून येत आहे. मागील तीन वर्षांच्या काळातही महागाव शहरातील विविध फंडातून संबंधित कंत्राटदारांनी बरीच कामे केली आहेत; पण आजमितीला त्यांच्याच घरापर्यंतचा रस्ताही पायी चालण्याजोगा नाही, ही शोकांतिका आहे. 

सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांच्या कामाची क्षमता जास्त काळ टिकण्याची आहे. त्यामुळे आज राष्ट्रीय महामार्गाचेही बांधकाम सिमेंट कॉंक्रिटमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानंतर अनेक ठिकाणी युद्धपातळीवर बांधकामे सुरू झालेली आहेत. पण 'शहरी भागातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता काही महिन्यांतच का ढासळते?' या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही. दर्जाहीन कामांची पोलखोल झालेली असतानाही वारंवार आलटून-पालटून त्याच कंत्राटदाराला कामे दिली जातात, याचे नेमके कारण तरी जनतेला सांगावे, ही जनभावना आहे. 

महागाव नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर स्थानिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात कोणतेही ठोस काम झाले नाही. शहरातील अनेक प्रभागांमधील नागरिक विविध सोयीसुविधांपासून अजूनही वंचित आहेत. आपल्या प्रभागाचे नेतृत्त्व कायमस्वरूपी आपल्याच हाती असावे, यासाठी सत्ताधारी गटांतील काही नगरसेवक विकासकामांच्या माध्यमातून करवून घेत आहेत. आपली पोळी भाजण्यासाठी विरोधी गटांतील नगरसेवकांकडून नगर पंचायतीच्या विविध विकासकामांत अनेकदा खोडा घातला आहे. यामुळे शहराच्या विकासकामात बराच अडथळा निर्माण झाला होता. 

कामे मिळताच विरोध कसा संपुष्टात येतो, हे येथील जनता पाहत आहे. येथील हेव्यादाव्याच्या राजकारणामुळे शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. येथील जनतेने अनेक नेत्यांना संधी दिली; पण 'रिझल्ट' तोच आहे. 

Web Title: marathi news marathi websites Yavatmal News Bribery