एमपीएससीमार्फत ४४९ पदांची भरती

नीलेश डोये
गुरुवार, 15 मार्च 2018

नागपूर - नोकरकपात करण्यात येत असल्याचा सरकारवर आरोप होत असताना राज्य शासनाने शासनाने जंबो पदभरतीचा निर्णय घेऊन बेरोजगारांना सुखद धक्का दिला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ४४९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी १३ मे रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. यात सामान्य प्रशासन, वित्त विभाग व गृह विभागासाठी नोकरभरती केल्या जात असून यातील निम्म्या जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित आहेत.

राज्यात सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासनाकडून दरवर्षी नोकरभरती करण्याची घोषणा केली होती. मात्र तसे झाले नाही. उलट शासनावरील आर्थिक भार वाढत असल्याने शासकीय नोकरीत मंजूर पदांच्या ३० टक्के पदांना कायमची कात्री लावण्याचा निर्णय घेतला. नव्याने नियुक्ती करण्याऐवजी निवृत्तांची सेवा घेण्यात येत असल्याने शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. शासनाच्या निर्णयाच्या विरोधात बेरोजगार युवकांकडून मोर्चे काढण्यात आले. राज्यात अलीकडच्या दशकात प्रथमच युवक नोकरीसाठी रस्त्यावर उतरल्याची चर्चा आहे. पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. 

हा असंतोष शांत करण्यासाठी ही भरती करण्यात येत असल्याची चर्चा आहे. एमपीएससीमार्फत गट बच्या (अराजपत्रित) एकूण ४४९ पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा १३ मे रोजी राज्यात ३७ केंद्रांवर होईल. २० मार्च अर्ज  करण्याची शेवटची तारीख आहे. यात सर्वाधिक ३८७ जागा पोलिस उपनिरीक्षक पदासाठी असून १२६ जागा राखीव प्रवर्गासाठी आहेत. सामान्य प्रशासनाच्या सहायक कक्ष अधिकाऱ्यासाठी २८ पदे असून यात एक जागा खेळाडूसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. तर राखीव गटात १३  जागा आहेत.

येथे करा अर्ज
जाहिरात संदर्भात निवडी व अर्जाच्या निकषाबाबत www.mpsc.gov.in    तसेच     https//mahampsc.mahaonline.gov.in  संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. तर https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावयाचा आहे.

Web Title: marathi news MPSC recruitment nagpur