महावितरणची ‘वायरवुमन’ खांबावर

चेतन देशमुख
सोमवार, 12 मार्च 2018

यवतमाळ - ‘चूल आणि मूल’ यातून बाहेर निघत महिलांनी सर्वच क्षेत्रांत दबदबा निर्माण केला. शिपाई, लिपिक, व्यवस्थापक अशा अतांत्रिक पदांबरोबरच महावितरणमध्ये अभियंता व लाइन स्टाफ पदावर रुजू झालेल्या महिला आता खांबावर चढून काम करीत आहेत. पूर्वी पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या ‘वायरमन’ पदावर आता ‘वायरवुमन’ म्हणून महिला काम करीत आहेत.  

जोखमीचे क्षेत्र असलेल्या सर्वच क्षेत्रांत महिलांनी काबीज करण्याबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकारण अशा क्षेत्रांत महिलांनी आघाडी घेतली आहे. केवळ ‘विद्युत’ क्षेत्रात महिलांचा अपवाद होता. या क्षेत्रातही आता महिलांनी भरारी घेतली. लाइनमनच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करीत आहेत. महावितरणने महिला सक्षमीकरणाचे पाऊल उचलले व वीजक्षेत्रातील तांत्रिक काम करण्यासाठी तीन ते चार हजार महिलांना केवळ संधीच दिली नाही, तर त्यांना ‘वायरवुमन’ ही नवी ओळखही दिली. वीजक्षेत्र हे प्रचंड जोखमीचे. महावितरणने काळजी घेत वायरवुमन ही केवळ ओळखच न देता त्यांना चांगले प्रशिक्षण दिले. या महिला ‘वायरवुमन’साठी नवीन ड्रेसही डिझाईन करण्यात आले. शिवाय, त्यांच्या अडचणींची दखल घेण्यासाठी विशेष समिती स्थापना केली. वीजक्षेत्रात चुकीला क्षमा नसते हे माहीत असतानाही हजारो महिला या ‘वायरवुमन’ म्हणून महावितरणमध्ये सक्षमपणे काम करताना दिसत आहेत.

Web Title: marathi news MSEB WireWoman