एसटी संपाला माणिकराव ठाकरेंचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

यवतमाळ : विधानपरिषदचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱयांच्या संपाला आज येथे पाठींबा जाहीर केला. 

त्यांच्यासह राहूल ठाकरे, अरुण राउत,अरविंद वाढोनकर, चंदुभाऊ चौधरी,दिनेश गोगरकर, अनिल गायकवाड, बबलु देशमुख,  छोटु पावडे यांनी यवतमाळ आगारासमोरिल संप स्थळाला भेट देऊन एसटी कर्मचारी यांच्या संपला पाठिंबा जाहीर केला.

ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कुठल्याही कर्मचाऱयांवर कारवाई होणार नाही व तुमच्या मागण्या पुर्ण होईपर्यत संप मागे घेऊ नका. काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी ठाम पणे उभा आहे. मी मुख्यमंत्र्यांशी संपाबाबत व आपल्या मागणीबाबत आपण लक्ष देऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेन.

यावेळी कामगार संघटनेचे सदाशिव शिवणकर, राहुल धार्मिक, इंटक संघटनेचे अध्यक्ष सतिश डाखोरे, म.मो.का.चे संजय जिरापुरे, पंजाब ताटेवार, स्वप्निल तगडपल्लीवार, सुभाष लाडंगे, संघर्ष ग्रुप चे सचिन गिरी, उपाध्ये, सह आयोग समितीने पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संपादरम्यान अकोले आगाराचे वाहक स्व. एकनाथ वाकचवरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Marathi news MSRTC Strike Manikrao Thackeray support Yavatmal News