प्रेमविवाहातून एकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

कामठी - मुलीला पळवून प्रेमविवाह केल्याने मुलीच्या कुटुंबातील २५ ते ३० जणांच्या समूहाने मुलाच्या घरावर प्राणघातक हल्ला केला. यात मुलाच्या मामाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे नवीन कामठी ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामगढ परिसरात तणावाची परिस्थिती आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

इकबाल जमिल शेख (रा. रामगढ, आनंदनगर) असे मृताचे, तर शेख अल्ताफ, शेख जमिल आणि त्यांची पत्नी जखमी आहेत. शेख अल्ताफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कामठी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये आनंदनगर येथील नवाब रहमान शेख, सलमान नवाब शेख, समीर नवाब शेख, इस्माईल अजीज खान, रज्जाक अजीज खान, सईद अजीज खान, जब्बार रेहमू खान, खुर्शिद हुसेन शेख, शेख सिकंदर, फिरोज, नसरू, काल्या ऊर्फ मुस्तफा खान, काल्याचा मोठा भाऊ गोलू, चांद खान, चांद खानचा भाऊ उस्मान खान, नजीर मोहम्मद खान, जहूर खान, शेख अलमी मुस्तफा, शेख साबिर इब्राहिम, काल्या उर्फ मोहम्मद रफीक शेख आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांचा समावेश आहे.

२ मार्चला पळाले होते घरून
सय्यद इरफान (२३) व नवाब शेख यांची मुलगी रहमतबी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. २ मार्चला दोघांनी पळून प्रेमविवाह केला. यानंतर इरफान तिला घेऊन परिसरातच राहण्यास आला. नवाब व नातेवाइकांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. याच वादातून सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आरोपींचे इरफानशी भांडण झाले. त्याला ठार मारण्याची धमकी दिली. याची तक्रार इरफानने कामठी पोलिसांत केली. तो ठाण्यात बसून तक्रार नोंदवीत असतानाच रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास आरोपींनी त्याच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. घराचा दरवाजा तोडून सामानाची तोडफोड केली.

बचाव करणे जिवावर बेतले
मृताचा भाचा इरफान यांच्या घरावर हल्ला होत असताना शेजारी राहणारे त्याचे आजोबा जमील आणि मामा इकबाल, अल्ताफसह इतरांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांनाच तलवार, चाकू आणि दंड्याने मारहाण केली. इकबालवर घातक शस्त्रांनी वार केले. जमिल, अल्ताफ आणि त्यांच्या आईलाही जखमी केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. इकबालला उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. येथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: marathi news murder love crime