डॉक्‍टरांनाही ‘जीपीआरएस’ लावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

नागपूर - महापालिकेच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्‍टर कधीच वेळेत येत नाही. यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत असल्याची तक्रार नगरसेविका आभा पांडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. डॉक्‍टर ऐकत नसेल तर सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही ‘जीपीआरएस’ लावण्याची सूचनाही त्यांनी केली. 

महापालिकेच्या आरोग्य केंद्रात डॉक्‍टरांची नियुक्ती केली आहे. काही खासगी डॉक्‍टरांची सेवाही घेतली जाते. त्यांच्या वेळाही निश्‍चित करण्यात आल्या आहेत. डॉक्‍टरांच्या वेतनावर दर  महिन्याला लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, नेमणूक केलेले डॉक्‍टर कधीच वेळेवर नागरी केंद्रात येत नाही. याची विचारणा केली असता अनेक कारणे सांगतात. वेळापत्रकाचा फलकही दडवून ठेवला जातो. एक डॉक्‍टर अर्धावेळ फक्त फोनवरच असतात. खासगी डॉक्‍टरांना किमान चार तास सेवा देणे बंधनकारक असताना तासभरच थांबतात. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. कोणी जाबही विचारत नसल्याने डॉक्‍टरांचे चांगलेच फावत आहे. दुसरीकडे रुग्णांचे हाल होत आहे. शेकडो कामगार, गोरगरीब या केंद्रात उपचारासाठी येतात. मात्र, डॉक्‍टरच येत नसल्याने रोजीरोटीचे काम सोडून त्यांना ताटकळत उभे राहावे लागते. बऱ्याच ठिकाणी कंपाउंडरच औषध देऊन त्यांचे समाधान करतो. डॉक्‍टरांवर नियंत्रण आणवे आणि गोरगरिबांना आरोग्य सुविधा द्यावी, अशी मागणी आभा पांडे यांनी केली.  

शांतीनगरातील मुदलियार चौकात एनयूएचएमचे केंद्र आहे. येथील डॉक्‍टरांची वेळ सकाळी आठ ते दुपारी चार अशी आहे. मात्र, डॉक्‍टर दहा वाजताच्या आत येतच नाही. मेडिकल ऑफिसर डॉ. प्राजक्ता कातोरे ९:४५ इस्पितळात आल्या. बालरोग विशेषज्ञ डॉ. सलीम फाजलानी यांची महिन्यातील पहिला, तिसऱ्या बुधवारी सकाळी आठ ते दुपारी बारा आशी सेवा असते. मात्र, तेसुद्धा दहा वाजता येतात. 
- आभा पांडे, नगरसेविका

Web Title: marathi news nagpur GPRS nagpur municipal corporation