राज्यातील देशी दारू दुकानदारांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

नागपूर - देशी दारू दुकानदारांकडे असलेला परवाना नूतनीकरणासाठी लादण्यात आलेल्या सुधारित नियमाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सुधारित नियमातील अटींची पूर्तता करण्याचे बंधन न लादता परवाना नुतनीकरणाची परवानगी देणाचा आदेश दिला.

या निर्णयाने देशी दारू दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे परवाना नूतनीकरणासाठी देशी दारू दुकानदाराकडे पार्किंगची सोय, बांधकामासाठी आवश्‍यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, कम्प्लायन्स सर्टिफिकेट आदींची पूर्तता करणे अनिवार्य राहणार नाही. 

Web Title: marathi news nagpur liquor shops mumbai court