दात्यांनी दिला एक कोटीचा निधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नागपूर - शिक्षण आणि रोजगारासाठी शहराकडे ओढा वाढल्याने गावे ओसाड पडत आहेत. ही स्थिती बघून ग्रामविकास संस्थेने ‘एक पहल अभिनव गाँव की और’च्या माध्यमातून गावात चांगल्या शिक्षणासोबत महिलांना रोजगार देण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील पवन पब्लिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासोबत महिलांना रोजगार देण्यात येतो. या शाळेची इमारत कोसळल्याने संस्थेकडून करण्यात आलेल्या आवाहनाला  प्रतिसाद देत दोन तासांत प्रतिष्ठित मान्यवरांनी मदतीचा हात पुढे करीत जवळपास एक कोटीची मदत उभी केली. 

संस्थेच्यावतीने सिव्हिल लाइन्स येथील चिटणीस सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच पवन पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर प्रकाश टाकण्यात आला. शाळेतील ४० टक्के विद्यार्थी इंग्रजीचे नि:शुल्क शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना वडील नसल्यामुळे त्यांच्या विधवा मातांना शाळेने रोजगार दिला आहे. या महिला कागदाचे पेन तयार करून संसाराचा गाडा चालवत आहेत. गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याला संस्थेचे प्राधान्य आहे. त्यांनी तयार केलेले कागदाच्या पेनला अमेरिकेत मागणी वाढली आहे. मागील पाच महिन्यांत या पेनच्या विक्रीतून ५ लाख ४६ हजार रुपये गोळा झाले आहेत.

संस्थेच्या वृंदन बावनकर यांनी सांगितले की, शाळेची इमारत कोसळल्यामुळे संस्थेसह  विद्यार्थ्यांना रेनकोट घालून वर्गात बसावे लागते. त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी संस्था प्रयत्नरत आहे. शाळेच्या नव्या इमारतीसाठी निधीची आवश्‍यकता असल्याने मदतीचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला मनीष सत्यनारायण नुवाल, उद्योजक विष्णू तांबी, विलास काळे, आर्किटेक्‍ट परमजित आहुजा, विष्णू मनोहर, डॉ. पिनाक दंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या आवाहनानंतर उपस्थित मान्यवरांकडून ९६ लाखांची मदत गोळा झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामविकास संस्थेच्या केतकी अरबट, आदित्य टोहरे, गौरव बजाज, कैलाश कोटवानी, प्रीती पटेल, प्रतीक कुथे, कृणाल सिंग, अनन्या देशपांडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: marathi news nagpur news