मुनगंटीवार यांचे समर्थक कोंडबत्तुलवार यांचा अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भुयार जवळ आज पहाटे हा अपघात झाला. कोंडबत्तुलवार यांच्या कारला (एमएच 34 7001) ट्रकने धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गडचिरोली - भाजप सोशल मिडीया सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक अमोल कोंडबत्तुलवार यांचा आज (शनिवार) पहाटे कार अपघातात मृत्यू झाला.

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भुयार जवळ आज पहाटे हा अपघात झाला. कोंडबत्तुलवार यांच्या कारला (एमएच 34 7001) ट्रकने धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कोंडबत्तुलवार यांच्या निधनाने सच्चा कार्यकर्ता हरपला- मुनगंटीवार
भाजपा चंद्रपूर जिल्हा संयोजक अमोल कोंडबतुनवार यांचे अपघाती निधन ही मनाला चटका लावणारी घटना असून त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. भाजप अमोलच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Web Title: Marathi news Nagpur news BJP leader dead in accident