अपहरणकर्ता सीसीटीव्हीत कैद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नागपूर - घरामसोर खेळत असलेल्या श्रद्धा अरुण सारवणे (चार वर्षे, रा. हत्तीनाला, लकडापूल) हिचे दुचाकीने अपहरण करून मेडिकलमध्ये सोडून आरोपीने पळ काढला होता. घटनेच्या सहा तासांत चिमुकली मेडिकलमधून सुखरूप मिळाली. अपहरण प्रकरणात पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. तसेच जवळपास ५० पेक्षा जास्त नशेखोरांना पोलिसांनी चौकशीसाठी गुरुवारी ताब्यात घेतले होते. अद्याप आरोपीचा शोध पोलिसांना लागला नसून काही गुंडांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास श्रद्धा सारवणे या चार वर्षीय चिमुकलीचे दुचाकीस्वाराने अहपरण केले होते. या घटनेनंतर गुन्हे शाखा आणि लकडगंज पोलिसांची पथके शहर पिंजून काढत शोध घेत होते. शेवटी एपीआय ज्ञानेश्‍वर भेदोडकर यांना माहिती मिळाली की, चिमुकलीला मेडिकल परिसरात पाहण्यात आले. त्यांचे पथक लगेच मेडिकलमध्ये दाखल झाले. त्यांनी वॉर्ड क्र. ३४ जवळून श्रद्धाला ताब्यात घेतले. चिमुकलीला आरोपीने दुचाकीवर बसून मेडिकल परिसरात सोडून पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला. युवक श्रद्धाला दरडावत हात पकडून ओढत मेडिकलमध्ये आणत आहे. एका जागेवर उभे राहण्यास सांगून तो पळून जाताना फुटेजमध्ये दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरून आणि हालचालीवरून तो नशेखोर वाटत आहे. त्यामुळे गुन्हे शाखा आणि लकडगंज पोलिसांनी ५० पेक्षा जास्त नशेखोरांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, अपहरणकर्ता आरोपी अद्याप मिळून आला नाही.

Web Title: marathi news nagpur news cctv camera

टॅग्स