नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढण्यास तयार - नितीन राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

नागपूर - केंद्रीय मंत्री तसेच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्याविरुद्ध कोण लढणार? त्यांना तगडी लढत देण्याची कोणात ताकद आहे. याचीच चाचपणी सुरू असताना राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी आपण लढण्यास तयार असल्याचे सांगून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास आपली लढण्याची तयारी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आपल्यात सामना झाल्यास तो संघभूमीविरुद्ध दीक्षाभूमी असा होईल, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता  निर्माण झाली आहे. यास मुत्तेमवार गटच कारणीभूत असल्याचा आरोप आहे.

नागपूर - केंद्रीय मंत्री तसेच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्याविरुद्ध कोण लढणार? त्यांना तगडी लढत देण्याची कोणात ताकद आहे. याचीच चाचपणी सुरू असताना राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी आपण लढण्यास तयार असल्याचे सांगून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास आपली लढण्याची तयारी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आपल्यात सामना झाल्यास तो संघभूमीविरुद्ध दीक्षाभूमी असा होईल, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता  निर्माण झाली आहे. यास मुत्तेमवार गटच कारणीभूत असल्याचा आरोप आहे. मागील निवडणुकीत गडकरी यांनी विलास मुत्तेमवार यांनी सुमारे तीन लाखांच्या फरकाने पराभूत केले. 

बनवारीलाल पुरोहित यांचा अपवाद वगळता शहराच्या राजकीय इतिहासात प्रथमच लोकसभेत भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. यामुळे आता नवीन उमेदवार द्यावा, अशी मागणी काँग्रेसमध्ये जोर धरत आहे. गडकरी यांना तुल्यबळ लढत देईल, असा नेता काँग्रेसमध्ये सध्या दिसत नाही. माजी मंत्री राजेंद्र मुळक, मुख्यमंत्र्यांविरुद्ध विधानसभेची निवडूणक लढणारे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांची नावे चर्चेत आहेत. अलीकडेच प्राचार्य बबनराव तायवाडेसुद्धा लोकसभेचे उमेदवार होऊ शकतात अशीही चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. यातच आपण लढण्यास तयार असल्याचे सांगून नितीन राऊत यांनी स्वतःच राजकीय धुराळा उडवून दिला आहे. विलास मुत्तेमवार आणि विकास ठाकरे गटला शह देण्यासाठी नितीन राऊत यांनी आपले नाव समोर केले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: marathi news nagpur news nitin gadkari nitin raut politics