चिमूर प्लॅस्टिकच्या साम्राज्यातून मुक्त व्हावे: डाॅ. विकास आमटे

Vikas Amte
Vikas Amte

चिमुर : आपण केलेला कचऱ्याचे आपणच विल्हेवाट करुन परिसर व शहर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असुन स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून करावी. ज्यामुळे चिमूर शहर प्लॅस्टिकच्या साम्राज्यातून मुक्त व्हावे, असे प्रतिपादन महरोगी सेवा समितीचे सचिव डाॅ. विकास आमटे यांनी पर्यावरण संवर्धन कमेटी चिमुरच्या वतीने आयोजीत प्लॅस्टिकमुक्त शहर अभियानाच्या प्रसंगी उपस्थितांना आवाहन केले. 

चिमूर येथे पर्यावरण संवर्धन विषयी लोकजागृती करीता विविध उपक्रम राबविणाऱ्या पर्यावरण संवर्धन समीतीतर्फे प्लॅस्टीक मुक्त शहर अंतर्गत हुतात्मा स्मारक चिमुर येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बंटी भांगडिया यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक डॉ. विकास आमटे, डॉ. बालमुकुंद पालीवाल, प्रमुख पाहुणे उपविभागीय अधीकारी हरीश धार्मिक, नगराध्यक्षा शिल्पा राचलवार, मुख्याधिकारी मनोजकुमार शहा, डॉ. दिलीप शिवरकर, प्राचार्य डॉ. अमीर धम्माणी, नगरसेविका हेमलता नन्नावरे, गट शिक्षणाधिकारी किशोर पिसे, मुख्याध्यापिका जोशीराव इत्यादी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

उद्घाटनपर मार्गदर्शनात आमदार भांगडिया यांनी सांगितले, की चिमूर शहर हि क्रांती भुमी आहे. त्यामुळे या चिमुर शहरापासूनच स्वच्छतेची क्रांती झाली पाहीजे. याकरीता पर्यावरण संवर्धन समितीला मदतीचे आश्वासन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डाॅ. बालमुकुंद पालिवाल यांनी प्लॅस्टिकपासून कोणकोणत्या वस्तू तयार करता येतात. याचे प्रात्याक्षिक सहीत मार्गदर्शन केले. विचारमंचावर उपस्थित मान्यवरांनी समयोचित मनोगत व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी नेहरु विद्यालयाकडून प्लॅस्टिक मुक्ती व स्वच्छ भारतवर सुरेख पथनाट्यी करणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गोमासे सर प्रास्ताविक कवडु लोहकरे तर आभार प्रदर्शन ऋषिकेश बाहुरे यानी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येनी विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.

प्लॅस्टिक मुक्त शहर अभियान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहरु विद्यालय, राष्ट्रीय विद्यालय, संत भय्यूजी महा. विद्यालय, आदर्श विद्यालय चिमुर पर्यावरण संवर्धन कमिटीचे अध्यक्ष कवडू लोहकरे, सूरेशजी बैनलवार, प्रा. माडवे, किसनजी नंदनवार, राकेश राऊत, पंकज वर्मा, अमीत मेश्राम, अक्षय खवसे, प्रविन लोहकरे, अमोल कुडसंगे, पीयूष जाधव, नितीन वनकर, सचीन खडके, विनोद आष्टनकर, कीशोर नंदनवार, उमाकात कामडी , श्रीकांत ठोंबरे , प्रशांत छापेकर , अमीत मोहीनकर , प्रफुल्ल शेडामे चंद्रशेखर रेवतकर, रमेश हीवरे, कार्तीक लोहकरे, शुभम जीवतोडे , प्रमोद गायधनी, आदी सदस्यानी अथक परिक्षम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com