चाहता निघाला अभिनेत्री श्रीदेवीच्या अंत्यदर्शनाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

नागपूर - सिनेवेड्यांची आपल्याकडे काही कमी नाही. कलाकारांच्या प्रेमापोटी काही फॅन्स फारच आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करतात तसाच मेडिकलचा हा कर्मचारी....नाव सुनील रेड्डी.

नागपूर - सिनेवेड्यांची आपल्याकडे काही कमी नाही. कलाकारांच्या प्रेमापोटी काही फॅन्स फारच आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करतात तसाच मेडिकलचा हा कर्मचारी....नाव सुनील रेड्डी.

चित्रपटातील कलावंतांशी ओळख करून घेणे, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांची धडपड नेहमीचीच. परंतु, श्रीदेवीच्या चित्रपट आला की, हमखास  बघायचाच. मात्र, शनिवारी भल्या पहाटे श्रीदेवीच्या मृत्यूची वार्ता ऐकताच त्याला राहावले नाही. ही दुःखद वार्ता त्याने पहाटेपासूनच मित्रांना फोन करून सांगण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच रेड्डी थांबले नाहीत. तर ते श्रीदेवीच्या अंत्ययात्रेसाठी जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हैदराबाद येथे श्रीदेवीच्या एका तेलुगू चित्रपटाची शूटिंग सुरू आहे, ही माहिती एका मित्राकडून मिळताच रेड्डी यांनी दशकापूर्वी हैदराबाद गाठले. तेथे चित्रपटाचे शूटिंग बघितले. त्यानंतर श्रीदेवी आणि बोनीकपूर नागपुरात आले असता, त्यांना बघण्यासाठी रेड्डी नागपूरच्या विमानतळावर पोहोचले. त्यांनी स्वतः ओळख करून घेतली आणि चक्क त्यांच्यासोबत फोटोदेखील काढला. रात्रीच्या गाडीने मुंबईला जाणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

Web Title: marathi news nagpur news sridevi Introspection sunil reddy