पोलिसांची विद्यार्थ्यावर दडपशाही, मूत्रमिश्रीत द्रव्य पाजल्याचे प्रकरण

Vishnu_Pawar
Vishnu_Pawar

नागपूर : कुकडे ले-आऊटमधील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात 10 ते 15 सिनीअर विद्यार्थ्यांनी विष्णू भारत पवार (वय 21, शेलू, परभणी) याला मूत्रमिश्रीत द्रव्य पाजल्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. 21 फेब्रुवारीला घडलेल्या प्रकाराबाबत "सकाळ'ने वृत्त प्रकाशित करताच सुस्त झोपेत असलेल्या अजनी पोलिसांनी जाग आली.

अजनी पोलिसांनी आज बयान घेण्यासाठी विद्यार्थ्यावर दबाव टाकला. त्यामुळे विद्यार्थ्याने बयान देण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे "सदरक्षणाय
खलनिग्रणाय' ब्रीद वाक्‍य असलेल्या पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.

विष्णू भारत पवार हा श्री. आयुर्वेदिक महाविद्यालयात बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत आहे. तो कुकडे ले-आऊटमधील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात गेल्या सहा महिन्यांपासून राहत होता. वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी 21 फेब्रुवारीला विष्णूची रॅगींग घेण्याचे ठरविले होते. ही माहिती मिळाल्यामुळे विष्णू मध्यरात्रीपर्यंत बाहेर फिरत होता. रात्री बारा वाजताच्या सुमारास विष्णू वसतीगृहाला आला आणि खोलीत अभ्यास करीत होता. वसतीगृहातील 10 ते 15 सिनीअर्सनी त्याला 205 रूममध्ये बोलावले. तेथे
त्याची रॅगींग घेतली. त्याला कपडे काढून मारण्यात आले. त्यानंतर त्याच्या अंगावर मूत्रविसर्जन करण्यात आले. उपाशीपोटी असलेला विष्णू रॅगिंगसाठी प्रतिकार करीत होता. मात्र, जवळपास तासभर लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण सुरू होती. अर्धमेल्याअवस्थेत पडलेल्या विष्णूला विद्यार्थ्यांनी एका बाटलीत मूत्र आणि ऑर्गेनिक फास्फेट नावाचे द्रव्य मिश्र करून बळजबरीने पाजण्यात आले. रात्री दीड वाजताच्या सुमारास तो बेशुद्ध पडल्यानंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती आणखी खालावल्यामुळे विष्णूची नातेवाईक रेखा काळे यांनी त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर तब्बल सात दिवस खासगी रूग्णालयात विष्णूवर शर्थीचे उपचार सुरू होते. मात्र, या प्रकरणाची कोणतीही दखल अजनी पोलिसांनी घेतली नाही. "सकाळ' प्रतिनिधीने विष्णू पवार आणि त्याचे वडील भारत पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ठळकपणे वृत्त प्रकाशित केल्याने आज पोलिस प्रशासनासह आदिवासी विभाग प्रशासनात खळबळ उडाली. आज मंगळवारी अकरा वाजता अजनी पोलिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी विष्णूचे बयाण नोंदविले आणि सायंकाळी ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पवार कुटूंब दहशतीच्या सावटाखाली
वसतीगृहातील विद्यार्थी आणि पोलिस यांच्या दडपशाहीमुळे पवार कुटूंब आज दिवसभर दहशतीच्या सावटाखाली होते. पोलिसांचा बयाण बदलविण्यासाठी वाढता दबावामुळे विष्णूसुद्धा घाबरला होता. वडील भारत पवार आणि आई मिना यांचीसुद्धा भेदरलेली अवस्था होती. शेवटी प्रसारमाध्यमांनी रेट्यामुळे अजनी पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेता, विष्णूने दिलेल्या बयाणावरून गुन्हा दाखल केला.

महिला सहायक निरीक्षकाचा दबाव
वसतीगृहात रॅगींग घेणारा आरोपी प्रशिल उईके याची नातेवाईक शहर पोलिस दलातील एका पोलिस ठाण्यात महिला सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. पुतण्याला वाचविण्यासाठी ती महिला एपीआय धडपड करीत होती. विष्णूच्या वृद्ध आईवडीलांनाही तिने दमदाटी केल्याची माहिती आहे. ती महिला अधिकारी आज सकाळी वसतीगृहातही उपस्थित होती. मात्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिसताच तिने काढता पाय घेतला.

माझ्या मुलाची रॅगींग करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गरीबांच्या मुलांनी शिक्षण घेऊ नये का?, गरीबांचा कुणी वाली नसतो का?,
पोलिससुद्धा आमच्यासोबत वैऱ्यासारखे वागत आहेत. आता आम्ही न्याय कुणाला
मागावा? आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मायबाप वरिष्ठ
पोलिस अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करावी. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन
न्याय द्यावा, अशी मागणी विष्णूचे वडील भारत पवार यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com