बळी घेणारी वाघीण झाली आई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

नागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील वनक्षेत्रात बळी घेणारी वाघीण (टी-१) तीन बछड्यांची आई झाली असली तरी तिला बेशुद्ध करा. बेशुद्ध करताना मात्र, तिच्या बछड्यांवर विशेष लक्ष द्यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायामूर्तींनी आज दिले. तसेच टी १ वाघीण आणि टी २ या वाघाला बेशुद्ध करण्याच्या कालावधीही दोन आठवड्यांनी वाढविला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव व केळापूर तालुक्‍यातील जंगलात वर्षभरापासून वाघीण आणि मानव यांच्यात संघर्ष होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने गोळा केलेल्या नमुन्यांवरून नरभक्षक वाघीण असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले. सखी, सावरखेडा, उमरी परिसरातील जंगलांत वाघिणीचा संचार आहे. वाघिणीला ट्रॅंक्‍युलाइज करण्यासाठी २०० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने तीन महिन्यांपासून जंगल पालथे घातले. गावकरी, शेतमजुरांना अधूनमधून वाघिणी आढळायची. मात्र, तिला पकडण्यात वनविभागाला अपयश आले होते.

मोठ्या प्रमाणात होत असलेली मनुष्यहानी लक्षात घेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी २९ जानेवारी रोजी टी-१ या नरभक्षक वाघिणीला दिसताक्षणी गोळी घालण्याचा आदेश दिला. तसेच त्याच आदेशामध्ये मानवी जीवितास धोका असलेला अन्य एक वाघ टी-२ याला बेशुद्ध करून बंदिस्त करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला पुन्हा दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. 

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या आदेशाला सुरुवातीला वन्यजीवप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्या सरिता सुब्रमण्यम यांनी हायकोर्टात आव्हान दिले. त्यांनी नरभक्षक वाघिणीला दिसताक्षणी मारण्याच्या आदेशाला विरोध दर्शविला. 

यानंतर डॉ. जेरिल बानाईत यांनीदेखील त्यांच्याद्वारे दाखल केला. दरम्यान, वनविभागाने आज टी १ या वाघिणीला तीन बछडे झाले असल्याची माहिती न्यायालयाला दिला. न्यायाधीशांनी बेशुद्ध करण्याचे आदेश कायम ठेवले आणि वाघिणीला बेशुद्ध करीत असताना बछड्यांकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना दिल्या आहेत.

Web Title: marathi news nagpur news tiger