मूत्रमिश्रीत द्रव्य पाजल्याचे प्रकरण; पारधी महासंघ धडकणार विधानभवनावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

घटनेच्या आठ दिवसापर्यंत अजनीचे ठाणेदार शैलेश संखे यांनी या प्रकरणाची नोंद घेतली नाही तसेच पीडित विद्यार्थी विष्णू पवार याचे बयाणही नोंदविले नव्हते. "सकाळ'ने या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित करताच अजनी पोलिस आणि आदिवासी विभाग खळबळून जागा झाला.

नागपूर : आदिवासी विद्यार्थ्याला मूत्रमिश्रीत द्रव्य पाजल्याचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस आणि आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी महासंघ येत्या 26 मार्चला मुंबईत विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत.

घटनेच्या आठ दिवसापर्यंत अजनीचे ठाणेदार शैलेश संखे यांनी या प्रकरणाची नोंद घेतली नाही तसेच पीडित विद्यार्थी विष्णू पवार याचे बयाणही नोंदविले नव्हते. "सकाळ'ने या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित करताच अजनी पोलिस आणि आदिवासी विभाग खळबळून जागा झाला.

घटनेच्या आठ दिवसांनंतर अजनी पोलिसांनी विष्णूचे जबाब नोंदविले. त्यावेळी पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांनी विष्णूला जबाब बदलण्यासाठी दमदाटी केल्याचा आरोप वडील भारत पवार यांनी केला होता.

Web Title: Marathi news Nagpur news urine issue

टॅग्स