'जुन्या, मोडकळीस आलेल्या शाळांची पुर्नबांधणी सरकारच्या विचाराधीन'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याबाबत काँग्रेसचे रामहरी रूपनवर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. राज्यात एकूण एक लाख 87 हजार 713 इतक्या शाळा असून साडे 98 टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत.

नागपूर : राज्यातल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या शाळांची पुर्नबांधणी करणे सरकारच्या विचाराधीन आहे. यासंदर्भात वित्त विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याबाबत काँग्रेसचे रामहरी रूपनवर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. राज्यात एकूण एक लाख 87 हजार 713 इतक्या शाळा असून साडे 98 टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत. त्याचप्रमाणे क्रीडांगणे, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच 92 हजार 640 इतक्या शाळांमध्ये रॅम्पची सोय आहे.

ज्या काही शाळांमध्ये या सोयी नाहीत, त्या शाळांमध्ये त्या देण्याचे काम सुरू आहे, असे तावडे यांनी यावेळी सांगितले. शाळांमधल्या शौचालयांसंदर्भात प्रधानमंत्री कार्यालयातून थेट पाठपुरावा करण्यात येतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून वारंवार आढावा घेण्यात येतो असे ते म्हणाले.

Web Title: Marathi news Nagpur news Vinod Tawade statement on schools