नागपूरकरांची उन्हाळ्यात कशी भागणार तहान?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

नागपूर - जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहराला मिळणाऱ्या पाण्याच्या कोट्यात कपात केल्याने यंदाच्या उन्हाळ्यात टंचाईची तलवार लटकत आहे. यातच गटारातील (सिव्हरेज) पाण्यामुळे शहरातील अनेक विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. एकीकडे नळातून कमी पाणी आणि दुसरीकडे विहिरीला दूषित पाणी, त्यामुळे उन्हाळ्यात तहान भागणार कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महानगरपालिकेला आता नाल्यासोबतच विहिरी साफ करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मध्य प्रदेशात बांधण्यात आलेल्या चौराई धरणामुळे पेंचच्या धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. याचा फटका शहर आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याला बसणार आहे. नागपूर महानगरपालिकेला १३५ एलपीसीडी पाणीपुरवठा निश्‍चित करण्यात आला आहे. हा पाणीसाठा विद्यमान साठ्यापेक्षा अल्प असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बोअरवेल, विहिरीचा  पाण्याची गरज भासणार आहे. मात्र, शहरातील अनेक विहिरी, बोअरवेल बंद असून काहींना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. काही भागातील साडपाणी वाहून नेणारी गटारे सुस्थितीत नाही. यामुळे गटारातील दूषित पाण्यामुळे भूजल ही दूषित होत आहे. हे दूषित पाणी विहिरींना मिळत असल्याने विहिरीचे पाणीही दूषित होत आहे. विशेष म्हणजे नुकतेच भूजलावर दोन दिवस मंथन झाले.

यावर विचारमंथनही झाले. मात्र, त्याचा परिणाम महानगरपालिका प्रशासनावर झाल्याचे दिसत नाही. या दूषित पाण्यासंदर्भात त्यांच्याकडून कोणत्याही उपाययोजनाच नसल्याची माहिती पुढे आली आहे.

चंद्रमणीनगर येथील विलास गेडाम, सचिन डोये यांच्याकडील विहिरीचे पाणी वापरण्यास योग्य होते. गटारीचे दूषित पाणी विहिरीच्या पाणीस मिळाल्याने ते ही दूषित झाले. 

मनपाने विहिरींकडे लक्ष द्यावे
महानगरपालिकेकडून गटारींचे योग्यपणे दुरुस्ती होत नसल्याने त्याचे दूषित इतर जलस्रोतास मिळत आहे. यामुळे भूजल स्रोत खराब होत आहे. यामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ कमी करण्यासाठी या स्रोतांना सुस्थितीत ठेवणे आवश्‍यक असल्याने महानगरपालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: marathi news nagpur news water shortage summer