विचारच नव्हे तर मानसिकताही बदला - कारागृह अधिक्षक राणी भोसले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

विचार बदलून फायदा नाही तर पुरूषी मानसिकतेतही आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे परखड मत मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी व्यक्‍त केले.

नागपूर - भारतात महिलांना समान अधिकार आणि समानता आहे. केवळ स्त्री-पुरूष समानता महत्वाची नाही. प्रत्येक पुरूषाने महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्‍यक आहे. विचार बदलून फायदा नाही तर पुरूषी मानसिकतेतही आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे परखड मत मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी व्यक्‍त केले. त्या न्यू नंदनवनमधील स्व. गोविंदराव वंजारी विधी महाविद्यालयात आयोजित 'आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धे'च्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्षा स्मिता वंजारी आणि वंजारी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल फडणवीस उपस्थित होत्या.

Web Title: marathi news nagpur womens day program