म्हसोला येथे स्त्रीचे अर्भक सापडल्याने खळबळ

सचिन शिंदे 
बुधवार, 24 जानेवारी 2018

आर्णी - तालुक्यातील म्हसोला येथे आज (ता. 24 जानेवारी) सकाळी 7 वाजता स्त्री अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे.

आर्णी - तालुक्यातील म्हसोला येथे आज (ता. 24 जानेवारी) सकाळी 7 वाजता स्त्री अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा अभियान राबविण्यात येत असतांना दुसरीकडे मात्र स्त्री जातीच्या नवजात अर्भक अमानुषपणे उकिरड्यावर फेकण्यात आल्याची घटना घडली. तालुक्यातील म्हसोला येथे ता 24 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ असलेल्या उकिरड्यावर फेकण्यात आले. ते अर्भक स्त्रीजातीचेे असल्याचे लक्षात येताच गावच्या सरपंचानी त्या अर्भकास आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यावर बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनिल भवरे यांनी उपचार केले. ते कमी दिवसाचे असून 2 किलो वजन आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने 108 रुग्णवाहिकेचे डॉ. अमोल गावंडे, वाहन चालक बालु देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल अमोल खडसे, महिला कर्मचारी मिनाक्षी सावरकर यांनी यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.

Web Title: marathi news new born baby girl found