वाहन परवान्यासोबत अवयवदानाचा संकल्प - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नागपूर- वाहन परवाना देताना चालकाकडून अवयवदान करण्याचे संकल्पपत्र भरून घेण्याचे धोरण शासन तयार करीत आहे. अवयवदानाच्या या चळवळीतून जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य भविष्यात घडेल, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. त्यासाठी टीसीएसची मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

माधव नेत्रालय सिटी सेंटरच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, अपघात व्हावे असे कुणालाही वाटत नाही. मात्र, दरवर्षी पाच लाखांवर अपघाताच्या घटनांमध्ये अडीच लाख मृत्युमुखी पडतात. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय महामार्गांवर किमान 700 ऍमिनिटी तयार करण्यात येणार आहे. या ऍमिनिटीजजवळ एक हेलिपॅड राहील. त्यातूनच लवकरात लवकर अपघातग्रस्तांना शहरी भागात आणण्याचीही व्यवस्था करता येईल. मात्र, दान करण्यात आलेले अवयव गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णालयाच्या छतावर हॅलिपॅड तयार करण्याची परवानगी राज्य शासनाने द्यावी, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. 

उपजिल्हा रुग्णालयांत "वेलनेस सेंटर' 
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. जगतप्रसाद नड्डा यांनी मोतीबिंदूवर मात करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. अर्थसंकल्पात "आयुष्यमान भारत' या योजनेच्या माध्यमातून 10 कोटी परिवारांना 5 लाखांचे "हेल्थ कव्हरेज' देण्यात येणार आहे. देशातील 1 लाख 50 हजार उपजिल्हा रुग्णालयांना "वेलनेस सेंटर' करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे ते म्हणाले. 

Web Title: marathi news nitin gadkari organ donation