नक्षलवाद्यांनी लावली वनडेपोला आग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

पेरमिली (जि. गडचिरोली) - जल, जंगल व जमिनीवर स्थानिकांचा अधिकार असून वनविभागाने वृक्षतोड करू नये, असे फर्मान सोडत सशस्त्र नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्‍यातील तलवाडा येथील वनविभागाच्या लाकूड आगाराला आग लावली. ही घटना आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास आलापल्ली-भामरागड मार्गावरील तलवाडा जंगल परिसरात घडली.

आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत तलवाडा येथील कक्ष क्रमांक 66 मध्ये कूपकटाई सुरू असून, तोडलेल्या झाडांचे बिट रचण्यात येत आहेत. काम सुरू असताना आज 10 ते 15 सशस्त्र माओवादी तेथे आले. त्यांनी सुमारे 10 ते 15 बिटातील लाकडांना आग लावली. मात्र, लाकडे ओली असल्याने खूप जळाली नाहीत. तरीही वनविभागाचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग लावल्यानंतर माओवाद्यांनी मजुरांना वनविभागाचे काम न करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी एक बॅनर बांधून पत्रकेही टाकली.

पोलिस आणि वन विभागाच्या कामांवर बहिष्कार घाला, लाकूड बिट, बांबू काढणे बंद करा, वनकर्मचाऱ्यांनी जंगलात प्रवेश करू नये. जल, जंगल व जमिनीवर आदिवासींचा अधिकार असून, ग्रामसभांच्या परवानगीशिवाय नैसर्गिक संपत्तीला हात लावू नका, अशा आशयाचा मजकूर बॅनर व पत्रकांवर आहे. भाकप नक्षलवादी पेरमिली एरिया कमिटीने हे पत्रक काढले आहे.

Web Title: marathi news permili gadchiroli news forest depo fire by naxalite