शेतमुजराच्या उपचारासाठी ग्रामस्थांकडून पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

संग्रामपुर (बुलढाणा) - तालुक्यातील बोडखा येथील आजारग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी ग्रामस्थांकडून पुढाकार घेण्यात आला. लोकवर्गणीच्या माध्यमातून पैसे गोळा केले गेले. मदतीसाठी 'सकाळ'मधून 10 जानेवारीला बातमी प्रकाशीत झाली होती.

बोडखा येथील 50 वर्षीय शेतमुजर एकनाथ उमाळे याना गँगरीन आजाराने ग्रासले आहे. कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचेवर घराची जबाबदारी आहे. कमवते एकनाथ आजाराने 3 महीन्यांपासून घरातच पडून आहेत. उपचारासाठी मोठया हॉस्पिटलमध्ये जाउन महागडा खर्च करण्याची त्याची कुवत नाही. म्हणून घरातच उपचाराविना पडून असल्याची बातमी 'सकाळ' वृत्तपत्रामधून 10 जानेवारीच्या अंकात प्रकाशित करण्यात आली होती. त्यावर बोडखा येथील भारीपचे उत्तम उमाळे, शत्रुघ्न बाजोडे यांचेसह प्रभाकर ठाकरे व अन्य ग्रामस्थ मिळून गावात आणि संग्रामपुरात मदतीसाठी फिरत आहेत. यातून गोळा झालेल्या रकमेतून सदर आजारग्रस्त उमाळे यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: marathi news poor farmer gangrene help

टॅग्स