संघर्ष सप्ताह साजरा करा- नक्षलवाद्यांचे गट्टा भागात बॅनरवरून आवाहन

मनोहर बोरकर
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

या बॅनरमुळे परिसरात दहशत पसरली असून, एटापल्लीवरुन गट्टा रस्त्यावरील वाहतूक दिवसभर बंद होती.

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस स्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यावर तिन ठिकाणी बॅनर लावून जनतेला संघर्ष सप्ताह साजरा करण्याचे आवाहन माओवादी संघटनेने केले आहे.

बरेच दिवसापासून शांत असलेल्या माओवादी चळवळीने (ता 13) बुधवारी पहाटेच्या दरम्यान गट्टापासून 5 कि.मी. अंतरावर अड़ंगे गावाजवळ बॅनर लावून नक्षलवादी समर्थक व नक्षल चळवळीतील आरोपींवरील गुन्हे शासनाने मागे घेण्यास जनतेने कॉम्रेड जतिनदासचे शहीद दिनाप्रीत्यर्थ दिनांक 13 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर संघर्ष सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

सदर बॅनरमुळे परिसरात दहशत पसरली असून, एटापल्लीवरुन गट्टा रस्त्यावरील वाहतूक दिवसभर बंद होती. त्यामुळे प्रवासी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. केंद्रीय कमिटी भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी असा उल्लेख करण्यात आला आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: marathi news sangharsh saptah naxalites appeal