शिष्यवृत्तीचा घोळ फक्त १६७ कोटींचा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

नागपूर - विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिष्यवृत्ती घोटाळा दोन हजार कोटींपेक्षा अधिकचा ठपका ठेवला असला समाजकल्याण विभागाने तो अमान्य केला आहे. फक्त १६७ कोटींची रक्कम अधिकची वाटप करण्यात आल्याचे स्पष्टीकरण शासनास दिले आहे. 

नागपूर - विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिष्यवृत्ती घोटाळा दोन हजार कोटींपेक्षा अधिकचा ठपका ठेवला असला समाजकल्याण विभागाने तो अमान्य केला आहे. फक्त १६७ कोटींची रक्कम अधिकची वाटप करण्यात आल्याचे स्पष्टीकरण शासनास दिले आहे. 

एसआयटी आणि समाजकल्याण विभागाच्या आकड्यात कोट्यवधींची तफावत असल्याने नेमका घोळ कितीचा? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  शिष्यवृत्ती वाटपात आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका समाजकल्याण विभागातील एका अधिकाऱ्याकडून ठेवण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी डॉ. व्यंकटेश यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली. एसआयटीने शिष्यवृत्ती वाटपात घोळ झाला असून हा घोटाळा दोन हजारांपेक्षा जास्त कोटींचा अहवाल दिला. ही रक्कम वसूल करण्यासोबत गुन्हेही दाखल करण्याची शिफारस केली. त्यानुसार काही शिक्षण संस्था चालकांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले. 

समाजकल्याण विभागाकडून एसआयटीच्या अहवालावर आक्षेप घेण्यात आला. एसआयटीचा अहवाल शासन आदेशांच्या विरोधात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्याचप्रमाणे वाटप करण्यात आलेल्या निधीपेक्षा जास्तही वसुली दर्शविण्यात आल्याचे सचिवांकडून शासनास सांगण्यात आले. विभागाकडूनच या संदर्भात तपासणी करण्यात आली असता १६७ कोटींच्या जवळपास निधी वसूलपात्र असल्याचे समोर आले.

जिल्ह्यात सहा कोटी
नागपूर जिल्ह्यात ही रक्कम जवळपास ६ कोटींच्या घरात आहे. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास ९८ कोटी रुपये वसूल करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात हा आकडा साडेपाच कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे.

Web Title: marathi news Scholarship exam nagpur news