न्यायव्यवस्थेभोवती असलेले कवच गळाले : न्या. चपळगावकर

नितीन नायगावकर
सोमवार, 15 जानेवारी 2018

नागपूर : 'सर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठतम न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदेद्वारे नाराजी व रोष व्यक्त करून न्यायमूर्तींना असलेले सुरक्षा कवच तोडून टाकले आहे. या कृतीमुळे न्यायमूर्तींवर आता उघडपणे सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. हे मतभेद उघड न करता, त्यावर संयमाने तोडगा निघणे अपेक्षित होते', असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केले.

विदर्भ साहित्य संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभासाठी नागपुरात आले असताना याप्रकरणावर त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ''न्यायालयातील अंतर्गत कामकाजाबद्दल यापूर्वीही न्यायमूर्तींमध्ये नाराजी होती. हे प्रकार आताच घडले असेही नाही. कोणत्याही व्यवस्थेमध्ये हे होत असते. याला न्याय प्रणालीही अपवाद नाही. आणीबाणीच्या काळातही सरकारच्या विरोधात निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या. पण, तत्कालिन न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली नव्हती. त्यांनी नाराजी व्यक्त करण्याचे वेगळे माध्यम निवडले. या अलिप्ततेमुळे न्यायमूर्तींबद्दल कुणीही उघडपणे माध्यमांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करीत नव्हते. यापासून प्रत्येकजण दोन हात दूर राहत होते.

महाराष्ट्राच्या राजकारणातील बित्तंबातमी वाचण्यासाठी क्लिक करा

'''सर्वोच्च न्यायालयातील या चार न्यायमूर्तींनी मांडलेले मुद्ये गंभीर आहेतच. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही', असे सांगून ते म्हणाले, ''चारही न्यायाधीश देशातील सर्वोत्तम न्यायाधीशांपैकी आहेत. परंतु, नाराजी व्यक्त करण्याची पद्धत मात्र निश्‍चितपणे चुकीची होती, असे मला वाटते. या न्यायमूर्तींच्या या कृतीमुळे न्यायव्यवस्थेभोवती असलेले कवच गळून पडले आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: marathi news Supreme Court Chief Justice Dipak Misra Indian Judiciary