उमा भारतींनी घेतली सरसंघचालकांची भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नागपूर - केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री उमा भारती काल नागपुरात दाखल झाल्या. त्यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. यानंतर त्या मध्यप्रदेशात रवाना झाल्या. संघाच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीनंतर भाजपात संघटनात्मक बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता संघटनेत फेरबदल होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

यासंदर्भातच भारती यांनी सरसंघचलाकांची भेट घेतल्याचे कळते. त्यांची ही भेट गोपनीय होती. उमा भारती यांनी नागपूरला देवदर्शनासाठी आल्याचे सांगितले. सकाळी दहा वाजता राजधानी एक्‍स्प्रेसने त्या नागपुरात दाखल झाल्या. संघाचे विचारवंत मा. गो. वैद्य यांची त्यांनी भेट घेतली. दिवसभर सरसंघचालक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे सायंकाळी पाच वाजता त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. येथून सावनेर येथील आदासा गणपती मंदिराचे दर्शन घेऊन मध्यप्रदेशाकडे निघाल्या. वाटेत जामसावळी येथील हनुमान मंदिराचे त्यांनी दर्शन घेतले.

Web Title: marathi news uma bharati Dr. Mohan Bhagwat