शिवाजी मार्केट संकुल गाळाचे लिलाव अनधिकृत

राजेश सोळंकी
शुक्रवार, 9 मार्च 2018

गाळ्यांची लिलाव प्रक्रिया नगरपालिकेच्या ई निविदा सूचनेद्वारे देण्यात आली होती. त्याची अंतिम तारीख गुरूवार (ता 8) होती. मात्र त्यापूर्वी मेघराज डोंगरे यांनी हा लिलाव गैरकायदेशीर असल्याची तक्रार दिली.

आर्वी (जि. वर्धा) - नगरपालिका प्रशासनाने येथील शिवाजी मार्केट संकुल गाळाचे ई निविदा सूचना गैरकायदेशीर असल्यामुळे ती रद्द करा, अशी मागणी पिरिपा चे जिल्हा नेते मेघराज डोंगरे यांनी न पा चे मुख्याधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.
   
गाळ्यांची लिलाव प्रक्रिया नगरपालिकेच्या ई निविदा सूचनेद्वारे देण्यात आली होती. त्याची अंतिम तारीख गुरूवार (ता 8) होती. मात्र त्यापूर्वी मेघराज डोंगरे यांनी हा लिलाव गैरकायदेशीर असल्याची तक्रार दिली. यात या संकुलची नगर रचनाकारकडून मान्यता घेणे बंधनकारक होते. मात्र ते न घेता कायद्याचे उल्लंघन व शासनाची दिशाभूल करुन सर्वसाधारण जनतेची फसवणूक केली आहे. भाडे मूल्य निर्धारण करण्याचा अधिकार त्रिस्तरीय सामितिला असून हे भाडे मूल्य सार्वजनिक बांधकाम विभागाने कसे ठरवले. यामुळे लाखो रुपयाचे न पा चे नुकसान होत आहे. शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे आरक्षण निचित असूनही ओबीसी आरक्षण निश्चित करण्यात आले नाहीत. अनुसूचित जातीकरिता 13,50 % आरक्षण असूनही केवळ 1 गाळा आरक्षित केला. त्यामुळे ही ई निविदा सूचना गैरकायदेशीर नियमबाह्य असून तात्काळ रद्द करुन नियमानुसार कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदोलन झाल्यास त्याच्या दुष्परिणामची जबाबदारी न प प्रशासनाची राहील असे तक्रारीत नमूद केले आहे. 
   
याबाबतीत  मुख्याधिकारी यांनी दखल घेत या गाळ्याचे लिलाव रद्द केले आहे. यासंदर्भात त्यांना विचारना केली असता. न पा चे हे गाळे १५ वर्षापुर्वी  बांधण्यात आले आहे. ते तसेच पडून असल्याने त्याचा ई निविदा द्वारे लिलाव सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. या नकाशात टाऊन प्लानिंगची मंजुरी नव्हती. दोन वेळा परवानगीसाठी पत्र दिले आहे. यात आमचा कोणतेही वैयक्तिक हेतू नाही. न पा उत्पन्न मिळावे हा हेतू आहे. तक्रार आली असल्याने जोपर्यंत शंका स्पष्टं होत नाहीत तोपर्यंत स्थागिती देण्यात येईल व त्यानंतर सुधारित लिलाव प्रक्रिया होइल, असे न प आर्वीचे मुख्याधिकारी गणेश शिंदे म्हणाले. 
 
 

Web Title: marathi news vardha shivaji market illegal auction