कोषागार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

कोषागार अधिकारी सुरेश बोधे यांनी कंत्राटदाराकडून थकीत असलेेले बिल मंजुर करण्याकरीता लाच घेतली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधच्या जाळ्यात अडकले.

चिमूर - उप कोषागार कार्यालय चिमूर येथे कोषागार अधिकारी म्हणून कार्यरत सुरेश बोधे यांनी भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून थकीत असलेेले बिल मंजुर करण्याकरीता दोन हजार रुपये लाच स्विकारत असताना दुपारी 2.30 ला लाच लुचपत प्रतिबंध विभाग चंद्रपुरच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

चिमूर येथील रहिवासी असलेले कंटेरीग व्यवसाय करणारे तक्रारदार ऑनलाईन ई निविदाद्वारे आश्रम शाळांचे कंत्राट घेऊन भोजन पुरवठ्याचे काम करतात. शासकीय आदीवासी मुलांचे वसतीगृह चिमूर येथे भोजन पुरवठा करण्याचे कंत्राट सन 2017-18 या वर्षाकरीता मिळाले. जुलै 2017 पासून भोजन पुरवठा करीत आहेत. डिसेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 चे अंदाजे 6 लाख 25 हजाराचे बिल थकीत आहे. हे थकीत बिल मंजुर करण्याकरीता उप कोषागार अधिकारी कार्यालय चिमूर येथे कार्यरत कोषागार अधिकारी सुरेश बोधे यांनी 3 हजार रुपयाची मागणी केली.      

तक्रारदाराला ही रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभाग चंद्रपुर यांचेकडे तक्रार केली. तक्रारीवरून 2 हजार देण्याविषयी तडजोड करून जाळ टाकण्यात आले व आज 12 मार्चला दुपारी 2.30 च्या दरम्यान 2 हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आल्याने सर्वत्र खळबळ माजली. या कार्यवाहीने लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदरची कार्यवाही पोलिस उपायुक्त/पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, विजय माहुलीकर, पोलिस उपअधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, चंदपूर यांच्या मार्गदर्शनात डी. एस. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, कार्यालयीन कर्मचारी मनोज पिदुरकर, अजय बागेसर, रविकुमार ढेंगळे व चालक पोलिस शिपाई राहुल ठाकरे यांनी यशस्वी पार पाडली.

Web Title: marathi news vidarbha chimur bribe corruption prevention