अवैध दारू तस्करीला कसतोय कायद्याचा चाप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

दारूची अवैध विक्री व तस्करी करणाऱ्यांवर गुन्ह्याप्रमाणे होणारी शिक्षेचे प्रमाण अल्पच आहे. मात्र चिमूर पोलिसांच्या कार्यकुशलतेने व जमा केलेल्या खडसंगी येथील कुख्यात दारू तस्कर प्रमोद खोब्रागडे व मोगली उर्फ राजकुमार चारकर यांना प्रत्येकी 3 वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रूपये दंडाच्या शिक्षेने अवैध दारू तस्करीला कायद्याचा चाप कसत आहेत.

चिमूर - चंद्रपूर जिल्हात दारू बंदीस तीन वर्षाचा कालावधी होत आहे. जिल्हा दारूबंदी झाल्यापासून अवैध दारू विक्रीला जणु काही ऊतच आला. यावर अंकुश लावण्याकरीता सर्व काम सोडून पोलिस विभागाचे याच गुन्हेगारीकडे लक्ष लागले आहे. दारूची अवैध विक्री व तस्करी करणाऱ्यांवर गुन्ह्याप्रमाणे होणारी शिक्षेचे प्रमाण अल्पच आहे. मात्र चिमूर पोलिसांच्या कार्यकुशलतेने व जमा केलेल्या खडसंगी येथील कुख्यात दारू तस्कर प्रमोद खोब्रागडे व मोगली उर्फ राजकुमार चारकर यांना प्रत्येकी 3 वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रूपये दंडाच्या शिक्षेने अवैध दारू तस्करीला कायद्याचा चाप कसत आहेत.

पोलिस स्टेशन चिमूर अंतर्गत येणाऱ्या खडसंगी जवळपासचा परिसर मोठ्या प्रमाणात जंगल व्याप्त असल्याने मुरपार मीनझरी परिसरात अवैध दारू विक्री, वाहतुक आणि साठवण करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यात प्रमोद खोब्रागडे आणी निश्नांत चालक मोगली यांचे सर्वाधिक प्रस्थ वाढले होते. 5 सप्टेंबर 2016 मध्ये चिमूरचे ठाणेदार दिनेश लबडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर अवैध दारू तस्करीचा म्होरक्या प्रमोद खोब्रागडे व पट्टीचा चालक मोगली उर्फ राजकुमार चाचरकर हे टाटा सुमो क्रमांक MH 34 K 9683 मध्ये दारूसाठा घेऊन येत असल्याचा सुगावा लागला. त्याप्रमाणे सापळा रचुण मोठया कल्पकतेने बडगा नाला परीसरात लपवून ठेवलेली गाडी हुडकुन काढली. 45 पेटया देशी दारू व गाडी मिळून 5 लाख 16 हजार 400 रूपयाच्या मुद्देमालासह मोगलीस अटक करण्यात आली. मात्र घटना स्थळावरून प्रमोद खोब्रागडे पसार झाला.

सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून प्राथमिक तपास चिमूरचे ठानेदार दिनेश लबडे यांनी आतिशय बारकाईने व कार्यकुशलतेने तपास करून दोषारोप पत्र सहाय्यक फौजदार सुधाकर माकोडे यांनी प्रथम श्रेणी न्यायालय चिमूर येथे दाखल केले. सदर गुन्हाची सुनावणी दरम्यान साक्षीदार व पंच फितुर होणार नाही याची योग्य काळजी घेण्यात आली. त्यामुळे सरकारी वकील संजय आर. ठावरी यांनी प्रशासणाची बाजु भक्कम व प्रभावीपणे मांडल्याने आज 13 मार्च रोजी प्रथम श्रेणी न्यायाधिश एम. एम. पळसापुरे यांनी आरोपी मोगली उर्फ राजकुमार हरीभाऊ चाचरकर वय 46 व प्रमोद उदय खोब्रागडे वय 46 यांना प्रत्येकी 3 वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने अधिक कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे .

चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत व चिमूर न्यायालय मार्फत. मागील महिन्यामध्ये खडसंगी येथीलच अवैध दारू विक्रेता सुरेश सहादेव खोब्रागडे यास सुद्धा 3 वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंड व हे न भरल्यास सहा महिने अधिकचा सश्रम कारावास अशीच शिक्षा सुनावली होती. अशा प्रकारे अल्पावधीतच अवैध दारु विक्रेते व तस्करावर होणाऱ्या लागोपाठ शिक्षेच्या निर्णयांने या अवैध व्यवसायात जम बसलेल्या व रग्गड पैसा कमावलेल्या गुन्हेगारात कायदया विषयी भिती निर्माण झाली असून त्यांच्यात वचक निर्माण होईल अशी आशा नागरीकांत वाढली आहे.

Web Title: marathi news vidarbha chimur illegal liquor smuggling law