बोंडअळी व पिककर्जाने घेतला शेतकऱ्याचा बळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

विजयसिंग उत्तमसिंग जाधव यांचेवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेम्बाचे 40 हजार रुपयांचे शेतीकर्ज आहे. सोबतच उत्पन्न वाढीला चालना मिळावी यासाठी त्यांनी हात उसणीचे पण कर्ज घेतलेले होते. 

नांदुरा (बुलडाणा) - बोंडअळी, सततची नापिकी व बँकेच्या कर्जापायी टाकरखेड येथील विजयसिंग उत्तमसिंग जाधव (वय 56) या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज (दि. 28) सकाळी 11 वाजता घडली आहे.

टाकरखेड येथील शेतकरी विजयसिंग उत्तमसिंग जाधव या शेतकऱ्यांकडे टाकरखेड शिवारात गट क्रमांक 327 मध्ये 2 एकर शेती असून गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांना अपेक्षित उपन्न मिळत नव्हते. त्यांचेवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेम्बाचे 40 हजार रुपयांचे शेतीकर्ज आहे. सोबतच उत्पन्न वाढीला चालना मिळावी यासाठी त्यांनी हात उसणीचे पण कर्ज घेतलेले होते. बँकेचे व हात उसणीचे पैसे परतफेड होत नसल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या विजयसिंग जाधव या शेतकऱ्याने अखेर कर्जबाजारीपणाला कंटाळून आज (दि. 28) मोनोसिल नावाचे विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली आहे. या शेतकऱ्याने यावर्षी कपाशी पीक पेरले असतांना त्यांचे कपाशी हे पीक बोंडअळीमुळे नेस्तनाबूत झाले आहे. शासन कर्जमाफीच्या घोषणेत तल्लीन असून प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकलेला नाही. यावर्षी बोंडअळीने कपाशी पिकाला गीळंगृत केले आहे. त्याच्या मदतीची घोषणा अद्यापही हवेतच आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आत्महत्येचा मार्ग निवळत आहे. हेच या शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Web Title: marathi news vidarbha farmer suiside agriculture loan