जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांची पुण्यात बदली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

गडचिरोली येथून महसूल उपायुक्त पदावरून बदलून आलेले कौस्तुभ दिवेगावकर यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा पदभार स्विकारण्यास केवळ आठ महिने झाले. त्यांची अचानकपणे बदली करण्यात आली.

जळगाव - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची पुणे महापालिकेच्या अप्पर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर मुंबई एमआयडीसीचे उपायुक्त एस. के. दिवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

गडचिरोली येथून महसूल उपायुक्त पदावरून बदलून आलेले कौस्तुभ दिवेगावकर यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा पदभार स्विकारण्यास केवळ आठ महिने झाले. त्यांची अचानकपणे बदली करण्यात आली. नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्यासह राज्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जारी झाले आहेत. त्यातच श्री. दिवेगावकर यांचीही बदली करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचे अप्पर आयुक्तपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जळगाव येथे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदी मुंबई एम. आय. डी. सी. चे उपायुक्त एस. के. दिवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: marathi news vidarbha jalgaon transfer kaustubh divegavkar