आठ दिवसांनंतर मिळाले जेवणाचे कोटेशन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नागपूर - क्रीडा स्पर्धेच्या भोजनासाठी मागविण्यात आलेल्या कोटेशनची प्रत दहा मिनिटांत सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकरी (सीईओ) डॉ. कादंबरी बलकवडे यांनी विस्तार अधिकारी सुरेश थोटे यांना  दिले होते. यावर अंमल करीत तब्बल आठ दिवसांनी थोटेंनी ते चौकशी समितीला सादर केले. कंत्राटदाराला बचावण्यासाठी कोटेशन ‘मॅनेज’ केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. 

नागपूर - क्रीडा स्पर्धेच्या भोजनासाठी मागविण्यात आलेल्या कोटेशनची प्रत दहा मिनिटांत सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकरी (सीईओ) डॉ. कादंबरी बलकवडे यांनी विस्तार अधिकारी सुरेश थोटे यांना  दिले होते. यावर अंमल करीत तब्बल आठ दिवसांनी थोटेंनी ते चौकशी समितीला सादर केले. कंत्राटदाराला बचावण्यासाठी कोटेशन ‘मॅनेज’ केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. 

शिक्षण विभागाच्या वतीने काटोल रोड येथील कन्या शाळेत २३ व २४ फेब्रुवारीला क्रीडा  स्पर्धेचे आयोजन केले होते. यासाठी आठ लाखांची तरतूद करण्यात आली असून, सहा लाख रुपयास मंजुरी आहे. स्पर्धेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाचे कंत्राट चव्हाण नामक कंत्राटदारास दिले होते. तीन लाखांच्या आतील खर्च असल्याने कोटेशन मागवून कंत्राट देण्यात आल्याचे विस्तार अधिकारी थोटे यांनी स्पष्ट केले होते. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना शौचालयातील  नळाचे पाणी पिण्याच्या वॉटर कॅनच्या टाकण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याचे वृत्त प्रकाशित होताच सीईओंनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे सीईओंनी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करून दोघांची विभागीय चौकशी सुरू केली. तर आर्थिक अनियमिततेची तपासणी करण्याचे आदेश वित्त व लेखा अधिकारी अहिरे यांना दिले. कोणतेही कोटेशन न मागविता कंत्राटदाराला काम दिल्याची चर्चा आहे. सीईओंनी ५ मार्च रोजी दहा  मिनिटात कोटेशन सादर करण्याचे आदेश थोटेंना दिले होते. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, थोटेंनी आठ दिवसानंतर ते दिले. चौकशी समितीला कोटेशन सादर करायचे असल्याने वेळेत त्यांची जुळवाजुळव करण्यात आल्याची चर्चा आहे. दहा  मिनिटांत सादर न झालेले कोटेशन आठ दिवसांनी आले कुठून, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

थोडक्‍यात टळले संकट 
याप्रकरणी गठित केलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर आणि आरोग्य अधिकारी डॉ. सवई सीईओंनी दिलेल्या मुदतीत अहवाल सादर केला. जाखलेकर आणि दोन दिवस रात्री दहा वाजेपर्यंत काम करून संबंधितांची साक्ष नोंदवून अहवाल तयार केला. विधिमंडळातही हा मुद्दा गाजला. चौकशी समितीने मुदतीत अहवाल दिल्याने जिल्हा परिषदवर आलेले संकट टळले, असेच म्हणावे लागेल. 
लोखंडेंमुळे मिळाले जेवण कंत्राटदाराकडून जेवण मिळत नसल्याची ओरड झाली. त्यानंतर शिक्षणाधिकारी दीपेंद्र  लोखंडे यांनी तत्काळ शाळा गाठत कंत्राटदाराला फोन करून जेवण देण्याचे आदेश दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांना जेवण मिळाल्याची माहिती आहे.

Web Title: marathi news vidarbha nagpur zp food