सिंदखेडराजाच्या विकासाचा निधी न दिल्यास आंदोलन करू- सुप्रिया सुळे

मिलिंद संगई
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

बारामती : राजमाता जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या सिंदखेडराजाच्या विकासासाबाबत राज्य सरकारने तोंडाला पाने पुसली आहेत. मुख्यमंत्र्यांनी 311 कोटींच्या विकासकामाची त्यांची घोषणा हवेतच आहे. येत्या एका महिन्यात शासनाने हा निधी उपलब्ध करुन दिला नाही तर सिंदखेडराजाच्या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सुप्रिया सुळे यांनी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे जाऊन जिजाऊंना अभिवादन केले. सिंदखेडराजाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षाआधी जाहीर केलेला 311 कोटींचा निधी अजूनही उपलब्ध करून दिलेला नाही. या भागात येणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा करुनही तीन वर्षानंतरही काहीही हालचाल होत नाही. 

त्यामुळे आता जर शासनाने एका महिन्याच्या आत निधी उपलब्ध करून दिला नाही तर मी येत्या 12 फेब्रुवारी रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत सिंदखेडराजाला येऊन उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करेन, असा इशारा त्यांनी दिला. निधीची घोषणा होऊनही तो दिला जात नाही ही सिंदखेडराजाच्या जनतेची शासनाने केलेली थट्टा आहे. ती आम्ही कदापि सहन करणार नाही. असेही त्या म्हणाल्या. 'करारी बाणा, स्वाभिमान आणि रयतेवर आईची माया करणाऱ्या या माऊलीच्या जन्मस्थळी अभिवादन करताना मला असीम उर्जा मिळते' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी आ. राजेश टोपे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष अॅड. नाझेर काझी उपस्थित होते.

Web Title: Marathi news vidarbha news birth anniversary of rajmata jijau at sindakhed raja