वाघाचा उपवास आणि वन कर्मचाऱ्यांचे जागरण

Chimur
Chimur

चिमूर (चंद्रपुर) : चिमूर तालुक्यातील वन परीक्षेत्राअंतर्गत मुरपार मंडळातील कक्ष क्रमांक 5 मधील भान्सुली गावाच्या जंगला नजीक असलेल्या तलावा काठी 21 फेब्रुवारी पासुन जखमी अवस्थेत असलेल्या वाघाने त्याच्या पुढे टाकलेले बकरे, कोंबडे याकडे दुर्लक्ष केल्याने वाघाचे उपवास आणि त्यांच्यावर नजर ठेऊन असलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची जागरण सुरू असल्याने नागरिकांत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

भान्सुली गावालगत असलेल्या जंगला काठच्या तलावाच्या जवळ मागील आठवड्या पासून वाघाचे दर्शन शेतकरी आणि गुराख्यांना होत असून, 21 फेब्रुवारीला दुपारपासून पूर्ण वाढ झालेल्या वाघाचे दर्शन झाले. याची सूचना वन विभागाला देण्यात आली. त्या प्रमाणे कर्मचारी आणी अधिकारी यांनी अहवाल वरीष्ठांना दिला. वन्य जीव तज्ज्ञ व रक्षकांचे पथक स्थळावर दाखल झाले. बघ्यांचीही गर्दी झाली. मात्र चार दिवसापासून जखमी अवस्थेत असलेल्या वाघाने काहीच खाल्ले नसल्याने तसेच जखमेमुळे काही पावले चालून पुन्हा बसकण मांडत असून वनराजाने आपले बस्तान तलावाच्याच बाजुला ठेवले असून यामुळे नागरीक आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. 

चार दिवसापासून ठाण मांडून असलेल्या वाघाविषयी वन विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. चाळीस वनकर्मचारी, अधिकारी, तज्ज्ञ फक्त जखमी वाघावर पाळत ठेऊन आहेत. वाघ वाचवा या राष्ट्रीय कार्यक्रमा करीता शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात येत आहे. त्याकरीता ब्रॅन्ड अॅम्बेसीडर, तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थेमार्फत कार्य केले जात आहे. मात्र भान्सुली परीसरातील या वाघाच्या उपचाराकरीता कोणत्याही प्रकारची तातडीची कार्यवाही केली जात नसल्याने सामान्य नागरीकांत वनाधिकाऱ्यांच्या वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे. या दरम्यान  वनविभागाच्या अती वेळ काढू धोरणामुळे वाघ मृत्यु तर पावणार नाहीणा अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने वाघावर उपचाराकरीता न्यावे गावकरी, शेतकऱ्यांना मोकडा श्वास घेऊ द्यावा अशी मागणी नागरीक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com