सदाभाऊंना शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मंगवारी (ता.26) वाशीम जिल्हा दौऱ्यावर आले होते. योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत कारंजा येथे शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मानोरा येथे भेट दिली.

वाशीम : स्वाभिमानी शेतकरी संघटनेना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना यांच्यातील कलगीतुऱ्याचे पडसाद आज विदर्भात उमटले. मानोरा येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व काही शेतकऱ्यांनी सदाभाऊच्या ताफ्यासमोर काळे झेंडे फडकावून घोषणा दिल्या.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मंगवारी (ता.26) वाशीम जिल्हा दौऱ्यावर आले होते. योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत कारंजा येथे शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मानोरा येथे भेट दिली. मानोरा येथील शिव चौकात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वाहनाचा ताफा आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना काळे झेंडे फडकावून घोषणा दिल्या. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.

आंदोलकांना पांगवितांना पोलिसांची मात्र भंबेरी उडाली. मालेगाव पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह कार्यकर्त्यांना सकाळीच ताब्यात घेतले होते.त्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

Web Title: Marathi news Vidarbha news Sadabhau Khot black flag