मुत्तेमवार काँग्रेसच्या  सुकाणू समितीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नागपूर - माजी केंद्रीय मंत्री तसेच पाच वेळा लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचाही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुकाणू समितीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता या समितीत अविनाश पांडे, मुकुल वासनिक यांच्यासह आणखी एका नागपूरच्या नेत्याची भर पडली.

राहुल गांधी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाल्यानंतर जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. नवीन कार्यकारिणीची निवड होईपर्यंत पक्षाचे  कामकाज सांभाळण्यासाठी सुकाणू समिती स्थापन केली. समितीच्या पहिल्या यादीत मुत्तेमवार यांचा समावेश नव्हता. ज्येष्ठ नेत्यांना समितीमधून डावल्यण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. सुधारित यादीत विलास मुत्तेमवारांचा समावेश केला आहे. उद्या शुक्रवारी होऊ घातलेल्या विषय समितीच्या बैठकीत मुत्तेमवार यांनाही निमंत्रित केले आहे.  

मुत्तेमार यांच्या नियुक्तीने त्यांचे शहरातील विरोधक माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि अनीस अहमद यांच्या गटाला जबर धक्का बसला आहे. विशेष म्हणजे चतुर्वेदी गटातर्फे मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे भाजपची बी टीम म्हणून कार्यरत असल्याचा आरोपही केली होता. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी राहुल गांधी यांना तसे पत्रही पाठविले होते. मुत्तेमवार आणि ठाकरे यांचीच पक्षातून हकालपट्टी करण्याचीही मागणी केली होती. 

यानंतरही मुत्तेमवार यांचा समितीत समावेश केल्याने आवारींच्या पत्राला राहुल गांधी यांनी केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होते. मुत्तेमवारांच्या सुकाणू समितीमधील समावेशाने विकास ठाकरे व त्यांच्या समर्थकांचे बळ आणखी वाढणार आहे.

Web Title: marathi news Vilas Muttemwar congress sukanu committee