शौचालयाचे पाणी पाजणे सात जणांवर शेकले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

नागपूर - जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी आणि शिक्षकांना शौचालयाचे पाणी पाजणे सात अधिकाऱ्यांवर चांगलेच शेकले आहे. 

विस्तार अधिकार सुरेश थोटे, केंद्रप्रमुख बबन ढवळे यांना निलंबित करण्यात आले तर गट शिक्षणाधिकारी छाया इंगोले व गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव यांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. कंत्राटी डॉ. शिल्पा वानखेडे यांची सेवा समाप्त करण्यात आली तर शिक्षणधिकारी दीपेंद्र लोखंडे आणि उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

काटोल रोडवरील कन्या शाळेत क्रीडा स्पर्धा घेण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शौचालयातील नळाचे पाणी पिण्यासाठी देण्यात आले. याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होताच जिल्हा परिषदेमध्ये चांगलीच खळबळ माजली. याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर व आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांची दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली. समिती संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली आणि संबंधित सर्व लोकांशी साक्ष घेतली. चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे शिक्षणाधिकाऱ्यांच्या शिफारशीने थोटे, ढवळे यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आले. दोघांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश सीईओ यांनी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले. 

असा आहे ठपका
विस्तार अधिकारी थोटे यांनी स्वत:कडे संपूर्ण जबाबदारी ठेवली. पैसाही स्वत:कडे ठेवला. व्यवस्थेचा अभाव होता. केंद्रप्रमुख बबन ढवळे यांची जबाबदारी महत्त्वाची होती. मात्र, यांनीही व्यवस्थेकडे लक्ष दिले नाही. संपूर्ण अवस्थेला तेच प्रमुख जबाबदार आहेत. विस्तार अधिकारी छाया इंगोले यांच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी होती. कार्यक्रमाच्या दिवशी रात्री मध्यरात्रीपर्यंत डीजे सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकांना दंड ठोठावला. यासाठी इंगोलेंना जबाबदार धरण्यात आले. गटशिक्षणाधिकारी जाधव यांनी कोणतही कार्य योग्यप्रकारे केले नाही. डॉ. वानखेडे यांनी आरोग्याकडे लक्ष दिले नाही. कामात हयगय केल्याने शिक्षणाधिकारी लोखंडे आणि कोल्हे यांना शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, म्हणून कारणे दाखवा  बजावण्यात आली. 

अन्न व औषध विभागाला माहिती दिली नाही 
सामूहिक भोजनाचा कार्यक्रम ठेवला असताना अन्न व औषध विभागाला माहिती देणे आवश्‍यक होती. मात्र कंत्राटदाराने याची माहिती दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. 

वित्त अधिकारी आज देणार अहवाल
आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश सीईओंनी वित्त व लेखा अधिकारी अहिरे यांच्याकडे दिले. त्यांच्याकडे कोटेशन आणि खर्चाबाबतची तपासणी होणार असून गुरुवारला अहवाल देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Web Title: marathi news water nagpur zp sakal news impact