सावधान, बालकांवरील अत्याचारात वाढ

सूरज पाटील
गुरुवार, 15 मार्च 2018

राज्यात वर्षभरात 15 हजारांवर गुन्हे
यवतमाळ - बालकांच्या संदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये राज्यात मोठी वाढ झाली असून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ सुमारे 10 टक्‍क्‍यांहून अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यात वर्षभरात 15 हजारांवर गुन्हे
यवतमाळ - बालकांच्या संदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये राज्यात मोठी वाढ झाली असून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ सुमारे 10 टक्‍क्‍यांहून अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

अर्थसंकल्पापूर्वी सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. विशेषतः बालकांवरील बलात्कार, अपहरणादी गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसते.

2017-18 च्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या हवाल्याने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बालकांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मोठी वाढ आहे. 2015 मध्ये अपहरण व पळवून नेण्याच्या घटनांची संख्या 6960, 2016 मध्ये 8016; तर 2017 मध्ये ही संख्या तब्बल 8850 एवढी आहे. बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. 2015 मध्ये बालकांच्या संदर्भात अत्याचाराचे 13,941 गुन्हे घडले. 2016 मध्ये ही संख्या 13591 होती. 2017 मध्ये मात्र ती तब्बल 15,534 वर गेली.

2017 मधील घटना
8850     15,534
अपहरण अत्याचार

Web Title: marathi news yavatmal news child Atrocity increase